Join us

India vs South Africa, 3rd Test : आफ्रिकेनं बोलावला प्रॉक्सी कर्णधार, तरीही 'विराट'नीतीसमोर झाली हार

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या तिसऱ्या कसोटीत कर्णधार विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 09:44 IST

Open in App

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या तिसऱ्या कसोटीत कर्णधार विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात स्थानिक खेळाडू शाहबाद नदीमला कसोटी पदार्पणाची संधी देताना टीम इंडियानं इशांत शर्माला विश्रांती दिली आहे. मालिकेत 0-2 अशा पिछाडीवर असलेल्या आफ्रिकन संघाने आजच्या लढतीत पाच बदल केले आहेत. एनगिडी, डी ब्रुयन, क्लासेन, लिंडे आणि पिएड यांना संधी देण्यात आली असून फिलेंडर, हम्झा, मार्कराम, महाराज, मुथूसामी यांना विश्रांती देण्यात आली आहे. आफ्रिकेच्या कर्णधार फॅफ ड्यु प्लेसिसला या मालिकेत एकदाही टॉस जिंकता आला नव्हता आणि त्यामुळे त्यानं तिसऱ्या कसोटीच्या नाणेफेकीसाठी प्रॉक्सी कर्णधाराला बोलावलं. हा प्रॉक्सी कर्णधार टीम इंडियासाठी लकी ठरला. जाणून घ्या नेमकं काय घडलं... भारताने पहिल्या व दुसऱ्या कसोटीत दणदणीत विजय मिळवून मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे हा सामना त्यांच्यासाठी केवळ औपचारिकता राहिला आहे. या सामन्याच्या नाणेफेकीसाठी फॅफनं प्रॉक्सी कर्णधार टेंबा बवूमाला बोलावले होते. पण, त्यानंतरही नाणेफेकीचा कौल कोहलीच्या बाजूनं लागला आणि फॅफला निराश चेहऱ्यानं ड्रेसिंगरुममध्ये परतावे लागले.

पाहा व्हिडीओ...

क्लीन स्वीपसह ४० गुण मिळविण्याचा भारताचा निर्धारमालिका आधीच खिशात घालणारा भारतीय संघ शनिवारपासून द.आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तिसºया आणि अंतिम कसोटीत विजय मिळवून ‘क्लीन स्वीप’च्या तसेच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील महत्त्वपूर्ण गुण संपादन करण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. हा सामना औपचारिक वाटत असला तरी विजयामुळे भारतीय संघ ४० गुणांची कमाई करेल. पहिल्या दोन्ही सामन्यात प्रत्येक क्षेत्रात भारताने वर्चस्व गाजवले होते.

 

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारताचे चार सामन्यातून २०० गुण, तर न्यूझीलंड व श्रीलंका यांचे प्रत्येकी १४० गुण आहेत. भारतीय संघात फलंदाजी आणि गोलंदाजीत कुठलीही उणीव जाणवत नाही. रोहित शर्मा याने सलामीवीर म्हणून चोख भूमिका बजावली. पहिल्या कसोटीत दोन्ही डावात त्याने शतके ठोकली होती. मयांक अगरवाल याने विशाखापट्टणमला द्विशतक, तर पुण्यात शतक ठोकले. कोहलीनेही कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट खेळी करीत २५४ धावा ठोकल्या होत्या. मालिकेत दोन अर्धशतकांची नोंद करणारा चेतेश्वर पुजारा याला येथे मोठी खेळी करण्याची संधी असेल. 

 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाविराट कोहलीबीसीसीआय