भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी रोहित शर्मानं द्विशतक आणि अजिंक्य रहाणेनं शतक झळकावले. रोहितचे कसोटी क्रिकेटमधील हे पहिलेच द्विशतक ठरले, तर अजिंक्यचे 11वे शतक ठरले. या दोघांनी 267 धावांची विक्रमी भागीदारी करताना भारताला मजबूत स्थितित आणले. या दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने चारशे धावांचा पल्ला पार केला. 3 बाद 39 अशा अडचणीत सापडलेल्या टीम इंडियाला त्यानं उपकर्णधार अजिंक्य रहाणेसह मजबूत स्थितित आणले. त्यानंतर रवींद्र जडेजानं अर्धशतकी खेळी केली. भारतानं पहिला डाव 9 बाद 497 धावांवर घोषित केला. आफ्रिकेला सुरुवातीलाच दोन धक्के बसले. त्यांचे 2 फलंदाज अवघ्या 9 धावांत माघारी परतले. अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला. आफ्रिका 488 धावांनी पिछाडीवर आहे.
10:45 AM
रहाणेला जीवदान

10:30 AM

09:10 AM
पहिल्या दिवसाचे हायलाईट्स