बंगळुरू, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉक आणि रिझा हेंड्रीक्स यांनी आफ्रिकेला दमदार सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या 6 षटकांत बिनबाद 43 धावा केल्या. हार्दिक पांड्यानं 11व्या षटकात भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानं हेड्रीक्सला बाद केले. कोहलीनं सुपर कॅच घेत हेंड्रीक्सला माघारी पाठवले. क्विंटन डी कॉकनं 39 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी रचलेल्या पायावर आफ्रिकेनं विजय साजरा केला अन् मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली. रॉयल चॅलेंजर बंगळुरूच्या घरच्या मैदानावर विराट कोहलीला पराभव पत्करावा लागला. आफ्रिकेनं 9 विकेट राखून हा सामना जिंकला. डी कॉकने 52 चेंडूंत 6 चौकार व 5 षटकारांसह नाबाद 79 धावा केल्या.
09:53 PM

09:51 PM
क्विंटन डी कॉकच्या ट्वेंटी-20 1000 धावा
09:42 PM
क्विंडन डी कॉकनं 39 चेंडूंत चार चौकार व 3 षटकारांसह अर्धशतक पूर्ण केले.
09:18 PM
क्विंटन डी कॉक आणि रिझा हेड्रीक्स यांनी आफ्रिकेसाठी सावध सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या 6 षटकांत बिनबाद 43 धावा केल्या
08:25 PM
15 षटकांपर्यंत भारताचे 6 फलंदाज 99 धावांवर तंबूत परतले होते.
08:06 PM
कोहली बाद झाल्यानंतर रिषभ पंत आणि श्रेयस अय्यरल आपली छाप पाडण्याची संधी होती. पंतने काही फटके खेचून आश्वासक खेळ केला, परंतु त्याला पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयश आले. तो 19 धावा करून माघारी परतला. त्यापाठोपाठ अय्यरही ( 5) बाद झाला.
07:26 PM

07:25 PM
भारताने पाच षटकांत 1 फलंदाज गमावर 41 धावा केल्या.