पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर

२५ वर्षांपूर्वी भारतीय संघावर आली होती मालिका गमावण्याची वेळ! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 06:40 IST2025-11-22T06:36:00+5:302025-11-22T06:40:02+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
India vs South Africa 2nd Test live streaming details When and where to watch the game in India | पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर

पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर

India vs South Africa 2nd Test Live Streaming Details : कोलकाता कसोटीतील पराभवानंतर भारतासाठी गुवाहाटीच्या मैदानातील सामना महत्त्वपूर्ण झाला आहे. भारतीय संघाचा नियमित कर्णधार शुभमन गिल मानेच्या दुखापतीमुळे संघाबाहेर झाल्याने दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत नेतृत्वाची धुरा रिषभ पंतकडे सोपवण्यात आली आहे. पहिल्या कसोटीत १५ वर्षांनी कोलकात्याचं मैदान गाजवत इतिहास रचलेल्या दक्षिण आफ्रिकेचा आत्मविश्वास उंचावलेला आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

२५ वर्षांपूर्वी भारतीय संघावर आली होती मालिका गमावण्याची वेळ! 

भारतीय भूमीवर दक्षिण आफ्रिकेचा शेवटचा कसोटी मालिका विजय २००० मध्ये हॅन्सी क्रोनिएच्या नेतृत्वाखाली झाला होता. आता बावुमाच्या संघासमोर २५ वर्षांनंतर मालिका जिंकण्याची संधी आहे. त्यामुळे गुवाहाटी कसोटी दोन्ही संघांसाठी निर्णायक ठरणार आहे.

IND vs SA 2nd Test: 'आमचं ठरलंय!' गिलच्या जागी कोण? कॅप्टन पंतनं उत्तर दिलं, पण...

कुठं आणि कधी खेळला जाणार सामना?

  • भारत vs दक्षिण आफ्रिका – दुसरी कसोटी
  • ठिकाण: बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी
  • तारीख: २२ नोव्हेंबर २०२५
  • सुरुवात: सकाळी ९.००
  • नाणेफेक: सकाळी ८.३०

IND vs SA LIVE मॅच कुठे पाहता येईल?

  • टीव्ही: Star Sports Network
  • डिजिटल: JioHotstar अ‍ॅप आणि वेबसाइटवर IND vs SA 2nd Test Live Streaming उपलब्ध

खेळाडूंच्य दुखापतीचा दोन्ही संघांना धक्का 

भारत: शुभमन गिल बाहेर; त्याच्या जागी कोण येणार याकडे सर्वांचे लक्ष.

द. आफ्रिका: स्टार पेसर कॅगिसो रबाडा दुसऱ्या कसोटीतही अनुपस्थित.

या खेळाडूंवर असेल भारतीय संघाची मदार 

दक्षिण आफ्रिकेसाठी हे खेळा़डू ठरु शकतात ट्रम्प कार्ड  

  • फलंदाजी: एडन मार्करम, टेम्बा बावुमा,टोनी डी झोर्झी
  • गोलंदाजी: मार्को यान्सेन, सायमन हार्मर

Team India  संभाव्य Playing XI

यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, साई सुदर्शन, ध्रुव जुरेल, ऋषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल/नितीश रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

South Africa संभाव्य Playing XI

रायन रिकेल्टन, एडन मार्करम, वियान मुल्डर, टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरेन (यष्टीरक्षक), मार्को यान्सेन, कॉर्बिन बॉश/लुंगी एनगिडी, सायमन हार्मर, केशव महाराज.

Web Title: India vs South Africa 2nd Test live streaming details When and where to watch the game in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.