IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)

क्विंटन डी कॉकच्या दमदार खेळीला जितेश शर्मानं चपळाईनं लावला ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 21:09 IST2025-12-11T21:08:37+5:302025-12-11T21:09:41+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
India vs South Africa, 2nd T20I Jitesh Sharma Sharp Work Behind Stumps Quinton De Kock's Sensational Innings End 90s Nervous nineties Watch Video | IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)

IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)

IND vs SA, 2nd T20I Jitesh Sharma Sharp Work Behind  Stumps Quinton De Kock Wicket : पहिल्या टी-२० सामन्यात खाते उघडण्यात अययशी ठरलेल्या क्विंटन डी कॉकनं दुसऱ्या टी-२० सामन्यात धमाकेदार खेळी केली. पण त्याच्यावर नर्व्हस नाइंटीची नामुष्की ओढावल्याचे पाहायला मिळाले. वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर तो एक चोरटी धाव घेण्यासाठी क्रीज बाहेर पडला. पण जितेश शर्मानं विकेटमागे चपळाई दाखवत मिळालेल्या संधीच सोनं करत त्याला तंबूचा रस्ता दाखवला.  पंजाब येथील न्यू चंदीगड येछील मुल्लानपूर येथील महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम क्विंटन डी कॉकनं  ४६ चेंडूत ७ षटकात आणि ५ चौकाराच्या मदतीने ९० धावांची खेळी केली.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

 क्विंटन डी कॉक आणि मार्करमची अर्धशतकी भागीदारी, वरुण चक्रवर्तीच्या खात्यात २ विकेट्स

नाणेफेक गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करताना क्विंटन डी कॉक आणि  रीझा हेंड्रिक्स जोडीनं दक्षिण आफ्रिकेच्या डावाची सुरुवात केली. वरुण चक्रवर्तीनं पॉवर प्लेमध्येच रीझाच्या रुपात भारतीय संघाला पहिली विकेट मिळवून दिली. पण त्यानंतर क्विंटन  डी कॉक आणि मार्करम जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी ४६ चेंडूत ८३ धावांची दमदार भागीदारी रचली. वरुण चक्रवर्तीने मार्करमच्या रुपात भारतीय संघाला दुसरे यश मिळवून दिले. 

"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा

शतकाच्या जवळ असताना पायावर मारून घेतली कुऱ्हाड

कर्णधार मार्करम परतल्याव क्विंटन डी कॉकनं आपला धमाका सुरुच ठेवला. तो अगदी सहज शतकाला गवसणी घालेल, असे वाटत असताना तो फसला. १६ व्या षटकात वरुण चक्रवर्ती गोलंदाजीला आला. या षटकातील पहिल्याच चेंडू हलक्या हाताने खेळून काढत क्विंटन डी कॉकनं एक धाव घेण्यासाठी क्रीज सोडले. विकेट मागे जितेश शर्मानं उत्तमरित्या आधी चेंडू अडवला. त्यानंतर त्याने चपळाईन त्याला धावाबाद केले.

क्विंटन डी कॉकचं शतक हुकलं, पण संघानं द्विशतकी डाव साधला अन्..

 क्विंटन डी कॉकचं शतक हुकले, पण त्याच्या क्लास खेळीनंतर डेवॉन फरेरा आणि डेविड मिलरच्या फटकेबाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने दुसऱ्या टी-२० सामन्यातील लढाई २०० पारची लढाई केली.  दक्षिण आफ्रिकेच्या संघाने निर्धारित २० षटकात ४ विकेट्सच्या मोबदल्यात २१३ धावा केल्या. भारताकडून वरुण चक्रवर्तीने घेतलेल्या २ विकेट्स वगळता अक्षर पटेलनं एक विकेट घेतली.

 

Web Title : IND vs SA: जितेश की फुर्ती से डी कॉक नर्वस नाइंटी का शिकार।

Web Summary : पहले टी20 में विफल रहने के बाद क्विंटन डी कॉक ने दूसरे टी20 में शानदार पारी खेली, लेकिन 90 रन पर आउट हो गए। जितेश शर्मा की विकेट के पीछे त्वरित सोच और चुस्ती ने डी कॉक को वरुण चक्रवर्ती की गेंद पर एक रन लेने की कोशिश करते हुए आउट कर दिया।

Web Title : IND vs SA: Jitesh's brilliance behind stumps ends De Kock's innings.

Web Summary : Quinton de Kock, after failing in the first T20, played a blistering innings in the second but fell for 90. Jitesh Sharma's quick thinking and sharp work behind the stumps led to De Kock's dismissal as he attempted a quick single off Varun Chakravarthy.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.