Join us

India Vs South Africa 2018 : विराटचा हनिमूनचा हँगओव्हर उतरलेला नाही, अनुष्कावरुनही मारले टोमणे

लग्नानंतर पहिलाच कसोटी सामना खेळणारा कर्णधार विराट कोहली (5) धावांवर स्वस्तात बाद होताच सोशल मीडियाने पुन्हा एकदा अनुष्का शर्माला जबाबदार धरले आहे. सोशल मीडियावर पत्नी अनुष्का शर्मावरुन विराट कोहलीला ट्रोल केले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2018 09:30 IST

Open in App
ठळक मुद्देविराट आऊट होताच सोशल मीडियावर क्रिकेट चाहत्यांनी अनुष्का शर्मावरुन विराटला टोमणे मारताना त्याच्या लग्नासंबंधी अनेक टि्वटस केले. 2015 वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धचा उपांत्यफेरीचा सामना पाहण्यासाठी अनुष्का ऑस्ट्रेलियाला गेली होती.

मुंबई - लग्नानंतर पहिलाच कसोटी सामना खेळणारा कर्णधार विराट कोहली (5) धावांवर स्वस्तात बाद होताच सोशल मीडियाने पुन्हा एकदा अनुष्का शर्माला जबाबदार धरले आहे. सोशल मीडियावर पत्नी अनुष्का शर्मावरुन विराट कोहलीला ट्रोल केले जात आहे. कालपासून भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. केपटाऊनच्या पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेला 286 धावांवर रोखल्यानंतर दिवसअखेरीस भारताच्या 3 बाद 28 धावा झाल्या. कर्णधार विराट कोहलीला फक्त (5) धावा करत आल्या.  मॉर्नी मॉर्केलने त्याला बाद केले. 

 

विराट आऊट होताच सोशल मीडियावर क्रिकेट चाहत्यांनी अनुष्का शर्मावरुन विराटला टोमणे मारताना त्याच्या लग्नासंबंधी अनेक टि्वटस केले. विराटचा हनिमूनचा हँगओव्हर अजून उतरलेला नाही एकाने म्हटले आहे. काल अन्य क्रिकेटपटूंच्या पत्नीसोबत अनुष्काही सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर उपस्थित होती. यापूर्वी 2015 वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धचा उपांत्यफेरीचा सामना पाहण्यासाठी अनुष्का ऑस्ट्रेलियाला गेली होती. त्यावेळी सुद्धा निर्णायक क्षणी विराट स्वस्तात बाद झाला होता. 

संघाला गरज असताना विराट बाद झाल्याने चाहत्यांनी अपयशासाठी अनुष्काला जबाबदार धरले होते. अनुष्काला त्यावेळी सोशल मीडियावर मोठया प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. अखेर विराटने टि्वटरच्या माध्यमातून अनुष्काला ट्रोल करणा-यांना खडेबोल सुनावले होते.                             

 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८
Open in App