Join us  

India vs South Africa, 1st Test : रोहित शर्माचं दे दणादण; वन डे, ट्वेंटी-20 अन् आता कसोटीत पराक्रम 

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीत दोन्ही संघांकडून तुल्यबळ खेळ झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2019 1:12 PM

Open in App

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीत दोन्ही संघांकडून तुल्यबळ खेळ झाला. भारताच्या पहिल्या डावातील 7 बाद 502 धावांच्या प्रत्युत्तरात 431 धावा केल्या. भारतानं 71 धावांच्या आघाडीसह दुसऱ्या डावाची सुरुवात केली. मात्र, दुसऱ्या डावात रोहित-मयांक जोडीला साजेशी सुरुवात करता आली नाही. मयांक अवघ्या 7 धावा करून माघारी परतला आणि भारताला 21 धावांवर पहिला धक्का बसला. त्यानंतर रोहितनं खिंड लढवत भारताला अर्धशतकी पल्ला पार करून दिला. दुसऱ्या डावात रोहितनं तीन खणखणीत षटकार खेचून इतिहास घडवला.

भारताच्या 7 बाद 502 धावांच्या प्रत्युत्तरात आफ्रिकेनं 431 धावा केल्या. डीन एल्गर ( 160), फॅफ ड्यू प्लेसिस ( 55) आणि क्विंटन डी कॉक ( 111) यांच्या फटकेबाजीनं आफ्रिकेचा फॉलो ऑन टाळला. सेनूरान मुथूसामीनं नाबाद 33 धावांची खेळी करताना संघाला 431 धावांपर्यंत मजल मारून दिली. भारताच्या आर अश्विननं 145 धावा देत 7 विकेट्स घेतल्या.  रोहितने 244 चेंडूंत 23 चौकार व 6 षटकार खेचून 176 धावा केल्या होत्या. त्यानं त्यात दुसऱ्या डावात आणखी तीन षटकार खेचून नव्या विक्रमाला गवसणी घातली.

एका कसोटीत सर्वाधिक 9 षटकार खेचणारा रोहित हा पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. त्यानं नवज्योत सिंग सिद्धूचा 1994 सालचा 8 षटकारांचा विक्रम आज मोडला. भारताकडून तीनही फॉरमॅटमध्ये एका सामन्यात सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम रोहितच्या नावावर झाला आहे. रोहितनं वन डेत 2013मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 16, तर ट्वेंटी-20त 2017मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 10 षटकार खेचले आहेत. 

आर अश्विननं 7 विकेट्स घेतल्या, पण टीम इंडियासाठी त्या महाग ठरल्याभारताच्या आर अश्विननं 145 धावा देत 7 विकेट्स घेतल्या. अश्विनने कसोटीच्या एका डावात पाचवेळा सात विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. पण, त्याची ही कामिगिरी सर्वोत्तम ठरली नाही. त्यानं इंदौर कसोटीत 2016-17मध्ये 59 धावांत 7 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिका ( 7/66, नागपूर 2015-16), वेस्ट इंडिज ( 7/83, नॉर्थ साऊंड 2016), ऑस्ट्रेलिया ( 7/103 चेन्नई, 2012-13) या विक्रमांचा क्रमांक येतो. 

शिवाय भारतात सात विकेट्स देण्यासाठी मोजलेल्या सर्वाधिक धावांच्या विक्रमात अश्विनची आजची कामगिरी तिसऱ्या स्थानी येते. यापूर्वी 1949मध्ये दत्तू फडकर यांनी चेन्नई कसोटीत वेस्ट इंडिजविरुद्ध 159 धावांत 7 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर बी चंद्रशेखर यांच्या 157 धावांत 7 विकेट्स ( वि. वेस्ट इंडिज, मुंबई 1966) यांचा क्रमांक येतो. चौथ्या स्थानावर  ऑस्ट्रेलियाचे जीम हिग्स ( 7/143 वि. भारत, चेन्नई 1979) आणि पाचव्या स्थानावर हरभजन सिंग ( 7/133 वि. ऑस्ट्रेलिया, चेन्नई 2001) यांचा क्रमांक येतो. 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकारोहित शर्मानवज्योतसिंग सिद्धू