भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : रोहित शर्मा आणि मयांक अग्रवाल यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीचा पहिला दिवस गाजवला. कसोटीत प्रथमच सलामीला आलेल्या रोहितनं खणखणीत शतक झळकावून अनेक विक्रमांना गवसणी घातली, तर मयांकनेही त्याला तोडीसतोड साथ दिली. रोहित आणि मयांक प्रथमच सलामीवीर म्हणून कसोटीत एकत्र खेळले. या जोडीनं 59.1 षटकांत 202 धावांची भागीदारी करून इतिहास घडवला. अंधुक प्रकाशामुळे दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. रोहितने 174 चेंडूंत 12 चौकार व 5 षटकार खेचून 115 धावा केल्या, तर मयांकने 183 चेंडूंत 11 चौकार व 2 षटकार खेचून 84 धावा केल्या आहेत.
01:53 PM
रोहितनं 166 चेंडूंत 10 चौकार व 5 षटकारांच्या मदतीनं 106 धावा केल्या.
12:39 PM
मयांक अग्रवालचीही अर्धशतकी खेळी, त्यानं 116 चेंडूंत 7 चौकार व 2 षटकारांच्या मदतीनं अर्धशतक पूर्ण केलं.
11:38 AM
उपाहारापर्यंत भारताने एकही विकेट न गमावता 91 धावा केल्या आहेत. रोहित शर्मानं 84 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकार खेचून 52, तर मयांक अग्रवालनं 96 चेंडूंत 6 चौकार व 1 षटकार खेचून 39 धावा केल्या आहेत.
10:56 AM
रोहित शर्मा आणि मयांक अग्रवाल यांनी भारताला पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून दिली. या जोडीनं 20 षटकांत 53 धावा केल्या.
10:21 AM
भारतीय संघाने 12 षटकांत एकही विकेट न गमावता 26 धावा केल्या आहेत
10:09 AM
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारतीय संघाने नाणेफेक जिंकून पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मयांक अग्रवाल आणि रोहित शर्मा यांनी भारताच्या सलामीची जबाबदारी खांद्यावर घेतली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने यापूर्वी 2015मध्ये दक्षिण आफ्रिकेचा घरच्या मैदानावर सामना केला होता आणि चार सामन्यांच्या मालिकेत यजमानांनी 3-0 अशी बाजी मारली होती. चार वर्षांनंतर निकाल काय लागेल हे येणारा काळच सांगेल, परंतु मैदानावर टॉसला येताच कोहलीनं विक्रम नावावर केला.
https://www.lokmat.com/cricket/india-vs-south-africa-1st-test-virat-kohli-equal-sourabh-ganguly-record-become-second-most-tests/
09:14 AM
