भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रोहित शर्मानं पहिल्या कसोटीचा चौथा दिवस गाजवला... सलामीवीर म्हणून पहिल्याच कसोटीच्या दोन्ही डावात शतकी खेळी करणारा पहिला भारतीय, एका कसोटीत सर्वाधिक षटकार खेचणारा फलंदाज, भारतीय खेळपट्टींवर सलग सात अर्धशतकी खेळी करणारा पहिला भारतीय... असे अनेक विक्रम रोहितने आज मोडले. त्याच्या शतकी आणि चेतेश्वर पुजाराच्या ( 81) अर्धशतकी खेळीनं भारताला दुसऱ्या डावात मजबूत आघाडी मिळवून दिली. त्याच्याच जोरावर भारतीय संघाने आफ्रिकेसमोर तगडे आव्हान ठेवले आहे. भारताने 4 बाद 323 धावांवर डाव घोषित केला. आफ्रिकेसमोर विजयासाठी 395 धावांचे लक्ष्य आहे. चौथ्या दिवसअखेर आफ्रिकेच्या 1 बाद 11 धावा झाल्या होत्या. मात्र, पाचव्या दिवशी ऑफ्रिकेच्या फलंदाजांची घरगुंडी उडाली.
LIVE
Get Latest Updates
04:03 PM
भारताचा दणदणीत विजय
01:21 PM
ऑफ्रिकेचे 148 वर ८ विकेट
12:46 PM
उपहारानंतर खेळाला सुरूवात
11:21 AM
दक्षिण ऑफ्रिकेचा आठवा गडी तंबूत
05:03 PM

01:18 PM

10:30 AM
आर अश्विनने 145 धावा देत 7 विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेचा डाव 431 धावांत गुंडाळला. भारताने पहिल्या डावात 71 धावांची आघाडी घेतली आहे. भारताने पहिल्या डावात 7 बाद 502 ( डाव घोषित) केल्या होत्या.