भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : निराशाजनक सुरुवातीनंर आफ्रिकन संघाने तिसऱ्या दिवशी दमदार कमबॅक केले. डीन एल्गनरची दीडशतकी खेळी आणि त्याला कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस आणि क्विंटन डी कॉक यांची साजेशी साथ, याच्या जोरावर आफ्रिकेनं पहिल्या कसोटीवरील टीम इंडियाची पकड सैल केली. एल्गरने भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्यानं दीडशतकी खेळी करताना आफ्रिकेला फॉल ऑन पासून वाचवले. एल्गर बाद झाल्यानंतर क्विंटनने शतक झळकावले. त्याच्या संयमी खेळीच्या जोरावर आफ्रिकेनं दिवसअखेर 8 बाद 385 धावा केल्या. पण, त्याच्या विकेटनं भारताला पुन्हा कमबॅक करण्याची संधी मिळवून दिली आहे. अश्विनने आफ्रिकेचा निम्मा संघ माघारी पाठवला.
04:16 PM
डी कॉकनं शतक पूर्ण केलं. भारतात शतक झळकावणारा तो आफ्रिकेचा पहिलाच यष्टिरक्षक ठरला, तर एबी डिव्हिलियर्सनंतर ( 2013 वि. पाकिस्तान) आशियात शतक झळकावणारा दुसरा आफ्रिकन यष्टिरक्षकाचा मानही त्यानं पटकावला.
02:41 PM
तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच इशांत शर्मानं आफ्रिकेला धक्का दिला. त्यानं टेंबा बवूमाला पायचीत केले. त्यानंतर फॅफ आणि एल्गर यांनी चौथ्या विकेटसाठी 115 धावांची भागीदारी केली. अश्विनने फॅफला माघारी पाठवले, पण क्विंटनने एल्गरसोबत खिंड लढवली. फॅफने 103 चेंडूंत 8 चौकार व 1 षटकार खेचून 55 धावा केल्या. क्विंटन आणि एल्गर या जोडीनं सहाव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. चहापानापर्यंत आफ्रिकेच्या 5 बाद 292 धावा झाल्या आहेत.
12:32 PM
एल्गन-फॅफची शतकी भागीदारी

11:00 AM
