IND vs SA 1st Test Jasprit Bumrah Removes Openers Ryan Rickelton And Aiden Markram : कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्सच्या मैदानात भारत आणि WTC चॅम्पियन दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला कसोटी सामना रंगला आहे. टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखाली अजूनपर्यंत एकही कसोटी न गमावलेला आफ्रिकेच्या संघ टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजीसाठी मैदानात उतरला. एडन मार्करम आणि रायन रिकल्टन जोडीनं संघाला चांगली सुरुवात करून दिली. जसप्रीत बुमराहनं अर्धशतकी भागीदारीसह सेट झालेली जोडी फोडली. बुमराहनं दोन्ही सलामीवीरांना तंबूत धाडत दक्षिण आफ्रिकेला बॅकफूटवर ढकलले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
परफेक्ट सेटअपसह आधी रियान रिकल्टनचा 'करेक्ट कार्यक्रम'
जसप्रीत बुमराहनं दक्षिण आफ्रिकेच्या डावातील ११ व्या षटकात एका अप्रतिम इनस्विंग चेंडूवर रायन रिकल्टन याचा त्रिफळा उडवला. आधी बुमराहने रायन रिकल्टन याला आउट स्विंगचा मारा केला. ११ व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर जस्सीनं कमालीचा इनस्विंग टाकत रायन रिकल्टनचा 'करेक्ट कार्यक्रम' केला. २२ चेंडूत ४ चौकाराच्या मदतीने त्याने २३ धावा काढल्या.
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
जबरदस्त 'बाउन्सर' अन् मार्करम झाला 'सरप्राइज'
कोलकाता कसोटी सामन्यात पहिली धाव घेण्यासाठी मार्करमनं २३ चेंडू खेळले. याआधी २०२२ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात २५ चेंडू खेळून त्याने खाते उघडल्याचे पाहायला मिळाले होते. वेळ घेतल्यावर खणखणीत चौकार मारत मार्करमनं खाते उघडले. त्यालाही बुमराहनं आपल्या जाळ्यात अडकवले. १३ व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर आखूड टप्प्याच्या चेंडूवर उसळता चेंडू टाकून बुमराहनं मार्करमला चकवा दिला. चेंडू बॅटची कड घेऊन विकेट किपर रिषभ पंतकडे गेला. त्याने कोणतीही चूक न करता त्याचा अप्रतिम झेल टिपला.
२००८ नंतर पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेच्या सलामी जोडीची अर्धशतकी भागीदारी
मार्करम आणि रायन रिकल्टन या जोडीनं पहिल्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी रचली. तब्बल १७ वर्षांनी दक्षिण आफ्रिकेच्या संघातील सलामी जोडीनं अर्धशतकी भागीदारी केल्याचे पाहायला मिळाले. याआधी २००८ मध्ये कानपूर कसोटीत ग्रेम स्मिथ आणि नील मॅकेंझी या दोघांनी ६१ धावांची सलामी दिल्याचा रेकॉर्ड आहे.