IND Vs PAK Live T20 Scoreboard : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत आज भारत-पाकिस्तान यांच्यातला महामुकाबला मेलबर्नवर होणार आहे. पावसानेही माघार घेतल्याने हा सामना होण्याची शक्यता बळावली आहे. भारत-पाकिस्तान देशांतील संबंध पाहता क्रिकेट मॅचमध्ये नेहमीच तणावाचं वातावरण असे आणि मैदानावरच नव्हे तर प्रेक्षकांमध्येही तो तणाव पाहायला मिळाला आहे. मेलबर्नवर होणारा सामना पाहण्यासाठी लाखाहून अधिक प्रेक्षक येणार आहेत व त्यात भारतीयांची संख्या ही ७० हजाराच्या आसपास आहे. दुपारी १.३० वाजल्यापासून सुरू होणाऱ्या या सामन्यासाठी आतापासूनच दोन्ही देशांचे चाहते मेलबर्न स्टेडियमवच्या बाहेर जमू लागले आहेत. दोन्ही संघांच्या सराव सत्रालाही मोठ्या संख्येने चाहते उभे होते. त्याचवेळी पाकिस्तानी चाहत्याने Virat Kohliला डिवचल्याची घटना घडली. India Vs Pakistan Live T20 Match
India Vs Pakistan T20 Live : भारत-पाकिस्तान सामना होणार की नाही? मेलबर्नवरून Exclusive Updates; आकाश चोप्रानेही दिली माहिती
भारत-पाकिस्तान सामना म्हणजे
बाबर आजम व
विराट कोहली यांच्यातली ठसन आलीच. मागील काही वर्षांत बाबरने भारताच्या स्टार फलंदाजाचे अनेक विक्रम मोडले आणि त्यामुळे त्याची तुलना विराटचा कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून होतेय. शाहीन शाह आफ्रिदीने मागील वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाची वाट लावली होती आणि यंदा त्याचे प्रत्युत्तर देण्यासाठी रोहित शर्मा व लोकेश राहुल सज्ज आहेत. सूर्यकुमार यादव हा टीम इंडियाचा X Factor पाकिस्तानची डोकेदुखी वाढवू शकतो. पण, आता पाकिस्तानी चाहत्यांनी विराटला डिवचून सापाच्या शेपटीवर पाय ठेवण्यासारखा प्रकार केला आहे. Ind vs Pak Live Scoreboard
विराटने आशिया चषक स्पर्धेत ट्वेंटी-२०तील पहिले शतक झळकावून आपला फॉर्म कमावला आणि त्याची कामगिरी साजेशी झालेली आहे. आरे ला कारे करणारा विराट आता पाकिस्तानी चाहत्याच्या स्लेजिंगनंतर मैदानावर कसे उत्तर देतो याची उत्सुकता आहे. सराव सत्र सुरू असताना पाकिस्तानी चाहत्याने ‘ऐ विराट, ऐ विराट, जरा बाबर आजम की तरह स्ट्रेट ड्राइव मारके दिखाओ.’ असे स्लेजिंग केले. काही चाहत्यांनी पाकिस्तानच्या घोषणाही दिल्या. India vs Pakistan T20 Int Live Match
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"