IND Vs PAK Live T20 Scoreboard : अखेर तो दिवस उजाडला... ICC ने जेव्हा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं तेव्हा जगभरातील क्रिकेट चाहते २३ ऑक्टोबरची आतुरतेनं वाट पाहू लागले. क्रिकेटमधील सर्वात मोठी ठसन India vs Pakistan आज मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर रंगणार आहे. लाख-दीड लाख प्रेक्षकांची उपस्थिती या महामुकाबल्यासाठी मैदानावर असणार आहे. पण, मेलबर्न हवामान खात्याने भारत-पाकिस्तान चाहत्यांचा जीव टांगणीला लागेल अशी बातमी दिली होती आणि ती म्हणजे पाऊस पडण्याची ९० टक्के शक्यता... त्यामुळे IND vs PAK सामन्यावर पावसाचं संकट आहे. अशात ICC नेही या सामन्याची वेळ सांगणारे ट्विट केलं आहे.
हर्षा भोगले यांच्या भारत-पाकिस्तान Playing XI मधून KL Rahul, रिषभ, कार्तिक आऊट
भारतीय संघाला मागच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता. यंदा सर्व काही सुरळीत वाटत असताना रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह व दीपक चहर यांना दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. त्यामुळे भारतीय संघ ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड स्पर्धेच्या जेतेपदाच्या शर्यतीत कुठेच नाही, असे अनेकांचे म्हणणे आहे. भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी भारताच्या सेमी फायनलमध्ये जाण्याची ३० टक्केच शक्यता असल्याचा दावा केला. माजी कर्णधार व BCCIचा माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने रोहित शर्माच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. Ind vs Pak Live T20 Match
आशिया चषक २०२२ स्पर्धेत उभय संघ दोनवेळा समोरासमोर आले आणि १-१ अशी बरोबरी राहिली. आशिया चषक स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय संघाने घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका जिंकली आहे. पण, अखेरच्या षटकांत भारतीय गोलंदाजांनी खूप मार खाल्ला आणि रोहितसाठी ती चिंतेची बात आहे. दुसरीकडे पाकिस्तानने न्यूझीलंड-बांगलादेश विरुद्धच्या तिरंगी मालिकेत विजय मिळवून ऑस्ट्रेलियात एन्ट्री घेतली आहे. त्यामुळे बाबर आजम अँड टीमचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. त्यात शाहिन शाह आफ्रिदीच्या पुनरागमनाने संघाची गोलंदाजी अधिक मजबूत झाली आहे. India Vs Pakistan Live T20 Match
शनिवारी मुसळधार पावसाची शक्यता मेलबर्न हवामान खात्यने वर्तवली होती, परंतु तुरळक पाऊस पडला. आजही असाच अंदाच चुकण्याची प्रार्थना क्रिकेट चाहते करत आहेत. सध्यातरी मेलबर्नमध्ये ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे सामन्यात सुरुवातीला पाऊस व्यत्यय आणण्याची शक्यता कमी होत चालली आहे. दुसऱ्या इनिंग्जमध्ये पावसाचा त्रास होऊ शकतो. आयसीसीने केलेल्या ट्विटनुसार तेथील स्थानिक वेळ म्हणजेच सायंकाळी ६.३० वाजता ( भारतीय वेळ दुपारी १.०० वाजता) नाणेफेक होईल आणि ७ वाजता ( भारतीय वेळ १.३० वाजता) सामन्याला सुरुवात होईल. पाकिस्तानमध्ये दुपारी १ वाजता सामना दिसेल. Ind vs Pak Live Scoreboard, India vs Pakistan T20 Int Live Match
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"