PCB files complaint against Arshdeep Singh, IND vs PAK Asia Cup Final: आशिया चषक २०२५ मध्ये आज भारत आणि पाकिस्तान या दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये अंतिम फेरीचा सामना रंगणार आहे. आशिया चषकाच्या ४१ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच IND vs PAK अशी फायनलची लढत रंगणार आहे. पण या फायनलपूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) स्टार भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. पीसीबीने भारतीय खेळाडूबाबत ICC कडे तक्रार दाखल केली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारतीय गोलंदाजावर अश्लील हावभाव केल्याचा आरोप केला आहे. याआधी पाक बोर्डाने भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव विरुद्धही तक्रार दाखल केली होती.
अर्शदीपवर काय आरोप?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्शदीप सिंगवर जो आरोप करण्यात आला आहे, ती घटना २१ सप्टेंबरची आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर फोर सामन्यादरम्यान ही घटना घडली होती. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या म्हणण्यानुसार, अर्शदीप सिंगने त्या सामन्यादरम्यान प्रेक्षकांकडे पाहून अश्लील हावभाव केले. पाक बोर्डाच्या आरोपात असे म्हटले आहे की, अर्शदीप सिंग याने ICCच्या आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या तक्रारीनुसार, अर्शदीप सिंग याने केलेले हावभाव आणि हातवारे हे खेळाप्रति बेजबाबदार दृष्टिकोन आणि खेळात व्यत्यय आणणारे होते. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आता अर्शदीप सिंगवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
आधी सूर्यकुमार यादवचीही केली होती तक्रार
अर्शदीप सिंगपूर्वी पाक बोर्डाने सूर्यकुमार यादवविरुद्धही तक्रार दाखल केली होती. पीसीबीने आपल्या तक्रारीत भारतीय कर्णधारावर क्रिकेटचे राजकारण करण्याचा आणि ICCच्या आचारसंहितेचे उल्लंघन करण्याचा आरोप केला होता.
BCCI च्या तक्रारीवरून हॅरिस रौफला शिक्षा
BCCIने हरीस रौफ आणि साहिबजादा फरहान यांच्याबाबत आयसीसीकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर आयसीसी सामनाधिकारी यांनी हरीस रौफला मॅच फीच्या ३० टक्के दंड ठोठावला.
Web Summary : Before the Asia Cup final, PCB filed a complaint with the ICC against Indian bowler Arshdeep Singh for allegedly making obscene gestures during a previous match. They previously complained against Suryakumar Yadav.
Web Summary : एशिया कप फाइनल से पहले, पीसीबी ने कथित तौर पर अश्लील इशारे करने के लिए भारतीय गेंदबाज अर्शदीप सिंह के खिलाफ आईसीसी में शिकायत दर्ज कराई। इससे पहले सूर्यकुमार यादव के खिलाफ भी शिकायत की थी।