India vs Pakistan : भारत-पाकिस्तान सामन्यासाठी रमीझ राजाची धडपड; झिजवतायेत इंग्लंड, ऑस्ट्रेलियाचा उंबरठा 

India vs Pakistan : भारत-पाकिस्तान या दोन कट्टर प्रतिस्पर्धींमध्ये क्रिकेटचा सामना म्हणजे जणू विश्वयुद्धच..

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 04:11 PM2022-01-11T16:11:42+5:302022-01-11T16:12:08+5:30

whatsapp join usJoin us
India vs Pakistan : PCB chairman Ramiz Raja to propose quadrangular series to revive Indo-Pak rivalry | India vs Pakistan : भारत-पाकिस्तान सामन्यासाठी रमीझ राजाची धडपड; झिजवतायेत इंग्लंड, ऑस्ट्रेलियाचा उंबरठा 

India vs Pakistan : भारत-पाकिस्तान सामन्यासाठी रमीझ राजाची धडपड; झिजवतायेत इंग्लंड, ऑस्ट्रेलियाचा उंबरठा 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Pakistan : भारत-पाकिस्तान या दोन कट्टर प्रतिस्पर्धींमध्ये क्रिकेटचा सामना म्हणजे जणू विश्वयुद्धच... पण,  दोन्ही देशांतील राजकीय संबंधांमुळे भारत-पाकिस्तान यांच्यातल्या क्रिकेट मालिकेला ब्रेक लागला आहे. उभय संघ आता फक्त आयसीसी आणि आशियाई क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळतात. २०१२-१३ मध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात अखेरची मालिका झाली होती. २०१५ ते २०२३ या कालावधीत नजाम सेठी यांच्या कार्यकाळात भारत-पाकिस्तान यांच्यात सहा मालिका होणे अपेक्षित होते, परंतु तसे झाले नाही. पण, आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे ( PCB) नवे अध्यक्ष रमीझ राजा ( Ramiz Raja) यांनी नव्यानं प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी ते इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांचा उंबरठा झिजवत आहेत.

-पाकिस्तान यांच्यात द्विदेशीय मालिका होणे शक्य नसल्याचे राजा यांनी आधीच मान्य केले होते. त्यामुळे त्यांनी नवा मार्ग शोधून काढला आहे. त्यांनी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, भारत आणि पाकिस्तान यांच्यात चार देशीय मालिका खेळवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. जेणेकरून या माध्यमातून भारत-पाकिस्तान सामन्यांना सुरुवात करण्याचा त्यांचा मानस आहे. 

भारत-पाकिस्तान हे संघ मागील वर्षी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भिडले होते. त्यात पाकिस्ताननं प्रथमच वर्ल्ड कप स्पर्धेत भारतावर विजय मिळवण्यात यश मिळवले होते. आता या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत उभय संघ भिडण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी सप्टेंबर महिन्यात आशिया चषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान लढत झालेली दिसेल. 

भारत-पाकिस्तान मालिकेबद्दल मांडलं होतं मत...
"सध्यातरी भारत-पाकिस्तान यांच्यातल्या कोणत्याही मालिकेची शक्यता नाही. राजकारणामुळे क्रिकेटवर खूप वाईट परिणाम झाला आहे आणि सध्याची स्थिती काही बदललेली नाही. त्यामुळे याबाबत कोणतीही गडबड आम्हाला करायची नाही. सध्या आम्हाला फक्त देशांतर्गत क्रिकेटवरच लक्ष केंद्रीत करायचं आहे", असं रमीज राजा म्हणाले. 

Web Title: India vs Pakistan : PCB chairman Ramiz Raja to propose quadrangular series to revive Indo-Pak rivalry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.