Join us

VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन

Jasprit Bumrah celebration after Haris Rauf wicket, IND vs PAK Asia Cup 2025 Final: जसप्रीत बुमराहने हॅरिस रौफचा त्रिफळा उडवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 22:46 IST

Open in App

Jasprit Bumrah celebration after Haris Rauf wicket, IND vs PAK Asia Cup 2025 Final: आशिया चषक २०२५ च्या अंतिम फेरीत भारतीय संघाने पाकिस्तानच्या फलंदाजांना १४६ धावांतच रोखले. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी स्विकारली. पाकिस्तानच्या डावाची सुरुवात आशादायक होती. साहिबझादा फरहानने ५७ आणि फखर जमानने ४६ धावांची चमकदार कामगिरी करून संघाला १ बाद ११२ पर्यंत पोहोचवले होते. परंतु मधल्या आणि खालच्या फळीने पार निराशा केली. कुलदीप यादवने चार तर वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराह या तिघांनी प्रत्येकी २-२ बळी घेत पाकिस्तानचा डाव १९.१ षटकांत १४६ धावांवर संपवला. पाकिस्तानच्या डावात हॅरिस रौफला बाद केल्यावर जसप्रीत बुमराहने केलेल कृती चर्चेचा विषय ठरली.

फरहान आणि जमान जोडीने पहिल्या विकेटसाठी ८४ धावा केल्या होत्या. फरहान ५७ धावांवर बाद झाल्यावर सैम अयुबच्या साथीने जमानने डाव पुढे नेला. जमान ४६ तर अयुब १४ धावांवर बाद झाला. त्यानंतर मात्र पाकिस्तानची घसरगुंडी उडाली. १८व्या षटकांत जसप्रीत बुमराह गोलंदाजीला आला. त्यावेळी हॅरिस रौफ फलंदाजी करत होता. डावाच्या पाचव्या चेंडूवर बुमराहने रौफला त्रिफळाचीत केले. त्याला क्लीन बोल्ड केल्यानंतर, बुमराहने हाताने मिसाईल पडल्यासारखा इशारा केला. हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. पाहा व्हिडीओ-

बुमराहच्या कृतीची चर्चा का?

हॅरिस रौफने भारताविरूद्धच्या सुपर-४ सामन्यात सीमारेषेवर उभा असताना भारतीय चाहत्यांकडे पाहून हातवारे केले. त्याने हाताने एक मिसाईल वर जाऊन फुटत असल्याचे किंवा खाली कोसळत असल्याचे हावभाव केले. अगदी तोच मुद्दा हेरून, आज बुमराहने हॅरिस रौफला बाद केल्यावर तसा इशारा केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Bumrah's 'Missile' Celebration After Dismissing Rauf in Asia Cup Final

Web Summary : India restricted Pakistan to 146 in the Asia Cup final. Bumrah dismissed Rauf, mirroring Rauf's earlier gesture towards Indian fans, sparking viral reactions. Kuldeep Yadav took four wickets.
टॅग्स :आशिया कप २०२५भारत विरुद्ध पाकिस्तानजसप्रित बुमराहपाकिस्तानभारतीय क्रिकेट संघ