India vs Pakistan, ICC World Cup 2019 : भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धेतील परंपरा कायम राखताना पाकिस्तान संघावर दणदणीत विजय मिळवला. रविवारी मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड येथे झालेल्या सामन्यात भारताने 89 धावांनी मिळवलेला हा विजय आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरला. या सामन्यात भारतानं 50 षटकांत 5 बाद 336 धावा केल्या, पाकिस्तानला डकवर्थ लुईस नियमानुसार 40 षटकांत 302 धावांचे लक्ष्य मिळाले होते. मात्र पाकिस्तानला 40 षटकांत 212 धावाच करता आल्या. या पराभवानंतर माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरनं पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदवर टीका केली. अख्तरनं सर्फराजला चक्क बिनडोक म्हटलं.
हरलं पाकिस्तान, ट्रोल झाली सानिया मिर्झा; दिलं सडेतोड उत्तर!पाकिस्तानच्या पराभवाचं खापर पाकिस्तानच्या चाहत्यांनी भारताची टेनिसपटू सानिया मिर्झावर फोडले. पाकिस्तानचा फलंदाज शोएब मलिकची पत्नी असलेल्या सानियानेही नेटिझन्सला त्यांच्या भाषेत सडेतोड उत्तर दिले. भारतविरुद्धच्या लढतीच्या एकदिवस आधी सानिया पती शोएबसह एका कॅफेमध्ये डिनरसाठी गेली होती. यावेळी पाकिस्तानचे काही खेळाडूही होते. त्यावरून नेटिझन्सने पाक खेळाडूंसह सानियावरही टीका केली.