India Vs Pakistan, ICC World Cup 2019 : टीम इंडियाने वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानला पुन्हा नमवून भारतीयांचा रविवार स्पेशल केला. भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्ध विजयाची परंपरा कायम राखली. रोहित शर्माचे खणखणीत शतक आणि त्याला लोकेश राहुल व विराट कोहलीच्या अर्धशतकी खेळीची मिळालेली साथ, याच्या जोरावर भारताने 336 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर कुलदीप यादवनं पाकिस्तानच्या डावाला कलाटणी देत भारताचा विजय पक्का केला. भारताने डकवर्थ लुईस नियमाच्या आघारे 89 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात रोहितनं 140 धावांची खेळी करत मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार पटकावला. रोहितनं या खेळीत एक फटका असा मारला की जो पाहून सर्वांना महान फलंदाज सचिन तेंडुलकर आठवला.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- India Vs Pakistan : 'हिटमॅन' रोहितचा 'तो' हिट पाहून सगळ्यांनाच 'सुपरहिट' सचिन आठवला!
India Vs Pakistan : 'हिटमॅन' रोहितचा 'तो' हिट पाहून सगळ्यांनाच 'सुपरहिट' सचिन आठवला!
India Vs Pakistan, ICC World Cup 2019 : टीम इंडियाने वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानला पुन्हा नमवून भारतीयांचा रविवार स्पेशल केला. भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्ध विजयाची परंपरा कायम राखली.
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 09:39 IST