आशिया चषक स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ असलेला भारतीय संघ रविवारी पाकिस्तान विरुद्ध भिडणार आहे. या स्पर्धेतच नव्हे तर एकंदरीत टी-२० स्पर्धेत भारतीय संघ हा नेहमीच पाकिस्तान विरुद्ध भारी ठरलाय. यावेळीही तोच सिलसिला कायम ठेवत पाकचा बुक्का पाडण्याच्या इराद्यानेच टीम इंडिया मैदानात उतरेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रण असो वा रनभूमी! भारतासमोर पाकचा निभाव लागणं मुश्किल, पण...
भारत-पाक यांच्यातील लढती वेळी नेहमीच दोन्ही संघातील खेळाडूंवर मोठा दबाव असतो. यात भारतीय संघ सरस ठरल्याचे पाहायला मिळाले आहे. पण यावेळी भारतीय संघातील खेळाडूंवर अधिक दबाव असेल. यामागचं कारण म्हणजे पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाक यांच्यातील संबंध पुन्हा तणावपूर्ण झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर भारतीय संघाने पाक विरुद्ध खेळू नये, असा सूर उमटत असताना ही लढत रंगणार आहे.
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
आशिया चषक स्पर्धेतील IND vs PAK यांच्यात रंगणार चौथा टी-२० सामना
आशिया चषक स्पर्धा तिसऱ्यांदा टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येत आहे. यात चौथ्यांदा भारत-पाक हे दोन संघ एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. याआधी या स्पर्धेत दोन वेळा भारतीय संघाने पाकचा धुव्वा उडवलाय. दुसरीकडे पाकिस्तानच्या संघाने फक्त एक सामना जिंकला आहे.
एकंदरीत टी-२० सामन्यातही टीम इंडियाचा दबदबा
आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटच्या आतापर्यंतच्या इतिहासात १३ वेळा भारत-पाकिस्तान यांच्यात लढत झाली आहे. २००७ च्या आयसीसी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्यांदा हे दोन संघ समोरासमोर आले होते. त्यावेळी दोन्ही वेळा टीम इंडियाने बाजी मारली होती. आतापर्यंत १३ सामन्यात १० वेळा भारतीय संघाने बाजी मारली असून फक्त ३ वेळा पाकिस्तान संघाने विजयाचा डाव साधलाय.
टीम इंडियासमोर फिका ठरेल फिरकीवर जोर देऊन डाव साधण्याचा फंडा
आशिया चषक स्पर्धेतील यूएईतील खेळपट्टीचा विचार करुन भारतीय संघाप्रमाणे पाकिस्तानच्या संघाने आापल्या गोलंदाजीतील जलदगतीची धार कमी करून फिरकीच्या जोरावर मैदान मारण्याचा प्लॅन आखल्याचे दिसते. ओमान विरुद्ध खेळलेल्या रणनितीसह ते टीम इंडियाविरुद्धही मैदानात उतरतील, असे दिसते. पण हा डावा टीम इंडियासमोर प्रभावी ठरणार नाही. कारण भारतीय संघातील फिरकीची जादू ही क्रिकेट जगतात सर्वात भारीये... एवढेच नाही तर टीम इंडियातील फलंदाजही फिरकीचा समाचार घेण्यात माहिर आहेत.