India vs Pakistan Head To Head: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचा इतिहास मोठा आणि गौरवशाली आहे. विश्वचषकातील सामन्यांमध्ये भारताचा वरचष्मा राहिला आहे. विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान आतापर्यंत ७ वेळा आमनेसामने आले आहेत. या सात सामन्यांमध्ये भारतीय संघानं पाकिस्तानचा पराभव केलाय.
१९९२ मध्ये या दोन संघांमध्ये पहिला सामना झाला होता. त्यावेळी पाकिस्ताननं विश्वचषक जिंकला होता, पण भारतीय संघापुढे शरणागती पत्करली होती. त्यानंतर १९९६, १९९९, २००३, २०११, २०१५ आणि २०१९ मध्येही हा विक्रम अबाधित राहिला. सर्व सातही सामन्यांमध्ये भारताचा विजय झाला.
भारतानं पाकिस्तानचा किती फरकाने पराभव केला?
२०१९ भारताचा ८९ धावांनी विजय (DLS मेथड)
२०१५ भारताचा ७६ धावांनी विजय
२०११ भारताचा २९ धावांनी जिंकला
२००३ भारताचा ६ गडी राखून विजय
१९९९ भारताता ४७ धावांनी विजय
१९९६ भारताचा ३९ धावांनी विजय
१९९२ भारताता ४३ धावांनी विजय
८ व्यांदा विजयचा प्रयत्न
भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येतील तेव्हा टीम इंडिया हा विक्रम ८-० नं करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर, शुभमन गिल, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि रोहित शर्मा यांसारख्या दिग्गजांनी भरलेला भारतीय संघ विजया मिळवण्यासाठी उतरेल. दुसरीकडे, अलीकडेच आशिया कपमध्ये भारतीय संघानं पाकिस्तानचा पराभव केलाय.