IND vs PAK, World Cup 2025: ठरलं! या दिवशी रंगणार भारत-पाक यांच्यातील हायहोल्टेज सामना

India vs Pakistan, World Cup 2025 Match Date: दोन्ही संघातील सामना कधी अन् कुठं रंगणार? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 14:23 IST2025-06-16T14:19:01+5:302025-06-16T14:23:50+5:30

whatsapp join usJoin us
India vs Pakistan Date Confirmed For Women’s World Cup 2025 Venue Date Details | IND vs PAK, World Cup 2025: ठरलं! या दिवशी रंगणार भारत-पाक यांच्यातील हायहोल्टेज सामना

IND vs PAK, World Cup 2025: ठरलं! या दिवशी रंगणार भारत-पाक यांच्यातील हायहोल्टेज सामना

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेला ३० सप्टेंबरपासून बंगळुरुच्या मैदानातून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक समोर आले आहे.  भारतीय महिला संघ स्पर्धेतील दुसऱ्याच सामन्यात पाकिस्तान विरुद्ध भिडणार आहे. भारत-पाक संघातील लढत क्रिकेट चाहत्यांसाठी नेहमीच उत्सुकतेचा विषय असतो. इथं एक नजर टाकुयात या दोन्ही संघातील सामना कधी अन् कुठं रंगणार  यासंदर्भातील सविस्तर माहितीवर. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

स्पर्धेतील दुसऱ्याच सामन्यात पाक विरुद्ध भिडणार भारत

महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध पहिला सामना  बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळेल. त्यानंतर भारताचा दुसराच सामना पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. ५ ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान यांच्यातील लढत श्रीलंकेतील कोलंबोच्या आर, प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाईल. 

आशिया कप स्पर्धा युएईच्या मैदानात खेळवण्याचा विचार; टीम इंडियासंदर्भात BCCI काय निर्णय घेणार?


पाकिस्तानचा एकाच मैदानावर खेळणार सर्व सामने

ICC महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धाही हायब्रिड मॉडेलनुसार खेळवण्यात येत आहे. पाकिस्तान संघ आपले सर्व सामने हे श्रीलंकेतील कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळणार आहे. गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियन संघ १ ऑक्टोबरला न्यूझीलंड विरुद्धच्या लढतीनं या स्पर्धेची सुरुवात करेल. ही लढत इंदुरच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे.  त्यानंतर ८ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियन संघ पाकिस्तान विरुद्ध कोलंबोच्या मैदानात खेळताना दिसेल. याशिवाय २२ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया इंग्लंड यांच्यातील सामनाही इंदुरच्या मैदानात रंगणार आहे.

या परिस्थितीत उपांत्य सामन्यासह अंतिम सामना भारताबाहेर

महिला वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेतील तीन नॉकआउट लढतीशिवाय साखळी फेरीत एकूण २८ सामने खेळवण्यात येणार आहेत. भारतातील सामने हे  बंगळुरु, इंदुर, गुवाहाटी आणि विशाखापट्टणमच्या मैदानात रंगणार असून श्रीलंकेतील सामने हे कोलंबो येथील प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत. जर पाकिस्तानचा संघ नॉकआउटमध्ये पोहचला तर  उपांत्य फेरीतील पहिला सामना हा २९ ऑक्टोबरला प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात येईल. जर साखळी फेरीतच त्यांचा संघ स्पर्धेबाहेर पडला तर हा सामना गुवाहटीच्या मैदानात खेळवला जाईल. स्पर्धेतील फायनल सामना हा २ नोव्हेंबरला बंगळुरुच्या मैदानात नियोजित आहे. जर पाकिस्तान संघ फायनलमध्ये पोहचला तर हा सामना कोलंबो येथे स्थलांतरित होईल.

असे असेल भारतीय महिला संघाचे वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील वेळापत्रक

  • भारत विरुद्ध  श्रीलंका- ३० सप्टेंबर, बंगळुरु 
  • भारत विरुद्ध पाकिस्तान- ०५ ऑक्टोबर, कोलंबो
  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका- ०९ ऑक्टोबर, विशाखापट्टणम 
  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया- १२ ऑक्टोबर, विशाखापट्टणम 
  • भारत विरुद्ध इंग्लंड- १९ ऑक्टोबर, इंदुर
  • भारत विरुद्ध न्यूझीलंड- २३ ऑक्टोबर, गुवाहाटी 
  • भारत विरुद्ध  बांगलादेश- २६ ऑक्टोबर, बंगळुरु

Web Title: India vs Pakistan Date Confirmed For Women’s World Cup 2025 Venue Date Details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.