टीम इंडियाने भारत-पाकिस्तान सामन्यात हास्तांदोलन न केल्याने पाकिस्तानचा चांगलाच तीळपापड झाला आहे. आशिया कपच्या मॅच रेफरीला हटविण्याची मागणी पाकिस्तानने केली होती. ती देखील आयसीसीने फेटाळून लावली आहे. अशातच आता पाकिस्तानचे माजी खेळाडू भारतीय संघाला शिवीगाळ करू लागले आहेत. पाकिस्तानचा ऑलराऊंडर मोहम्मद युसूफने सूर्य़कुमार यादवच्या नावाचा घाणेरडा उच्चार केला आहे.
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
माजी पाकिस्तानी खेळाडू मोहम्मद युसूफने एका टीव्ही कार्यक्रमात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवसाठी अपशब्द वापरले आहेत. सूर्यकुमारच्या ऐवजी सुअरकुमार असे शब्द युसूफने वापरले आहेत. टीव्ही अँकरनी भारतीय कप्तानाचे नाव सूर्यकुमार असल्याचे त्याला सांगितले. तर त्याने मी तेच बोललो सुअरकुमार असे निर्लज्जपणे म्हटले आहे. दोन तीनवेळा त्याला रोखण्यात आले होते. परंतू युसूफ तेच बरळत राहिला. मोहम्मद युसूफला लाईव्ह टीव्हीवर प्रमुख पाहुणा म्हणून डिबेटसाठी बोलविण्यात आले होते.
युसूफने सुर्यकुमारला अपशब्द वापरल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. यावर भारतीय आता टीका करू लागले आहेत.
सूर्यकुमारने भारत-पाकिस्तान सामन्यावेळी टॉस सुरु असताना पाकिस्तानी कप्तानासोबत हस्तांदोलन केले नाही. तसेच सामना संपल्यावरही भारतीय संघ हस्तांदोलन करण्यासाठी आला नाही. शेवटचा विजयी षटकारही सूर्यानेच मारला होता. तेव्हाही सूर्यकुमारने पाकिस्तानी खेळाडूंशी हात मिळविले नाहीत. यामुळे पाकिस्तानी आजी-माजी खेळाडू सूर्यावर चांगलेच आगपाखड करत आहेत.