Join us

पावसामुळे संपूर्ण मैदान झाकलं! षटकं कमी झाल्यास पाकिस्तानसमोर असेल नवीन लक्ष्य; पाहा गणित

India vs Pakistan Asia Cup 2023 Match Live ScoreCard Today : भारताची इनिंग्ज संपल्यानंतर जोरदार पावसाची सुरूवात झाली आणि आता तर संपूर्ण मैदान झाकण्यात आलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 20:34 IST

Open in App

India vs Pakistan Asia Cup 2023 Match Live ScoreCard Today : भारताची इनिंग्ज संपल्यानंतर जोरदार पावसाची सुरूवात झाली आणि आता तर संपूर्ण मैदान झाकण्यात आलं आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास षटकं कमी होतील आणि त्यानुसार पाकिस्तानसमोरील लक्ष्यही बदलेल.India vs Pakistan Live Asia Cup Match 

Shahid Afridi ने 'जावई' शाहीन आफ्रिदीचे तोंडभरून कौतुक केले, भारतीयांबद्दल म्हणाला... 

भारत-पाकिस्तान यांच्यातल्या आशिया चषक स्पर्धेतील आजच्या सामन्यातील पहिल्या डावाची विभागणी तीन टप्प्यात करावी लागेल. शाहीन शाह आफ्रिदी आणि हॅरिस रौफ यांनी ४ फलंदाज ६६ धावांवर माघारी पाठवले. मधल्या षटकांत हार्दिक पांड्या व इशान किशन यांच्या भागीदारीने भारताला सावरले. अखेरच्या टप्प्यात इशान व हार्दिक यांच्या विकेट जलदगती गोलंदाजांनी काढल्या अन् भारताला २६६ धावांवर समाधान मानावे लागले. पाकिस्तानच्या जलदगती गोलंदाजांनी २७.५ षटकांत २ निर्धाव षटकांसह १२९ धावा देत १० विकेट्स घेतल्या.  पाकिस्तानच्या फिरकीपटूंनी २१ षटकांत एकही विकेट न घेता १३३ धावा दिल्या. India vs Pakistan Live Match 

रोहित शर्मा ( ११), विराट कोहली ( ४), श्रेयस अय्यर ( १४) व शुबमन गिल ( १०) हे अपयशी ठरले. इशानने ८१ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांसह ८२ धावा, तर हार्दिकने ९० चेंडूंत ७ चौकार व १ षटकारांसह ८७ धावा केल्या. या दोघांनी १३८ धावांची भागीदारी केली आणि पाकिस्तानविरुद्ध पाचव्या किंवा त्या खालच्या क्रमांकासाठीची ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. रवींद्र जडेजा ( १४), शार्दूल ठाकूर ( ३) या अतिरिक्त फलंदाज म्हणून खेळवलेल्या खेळाडूंनी निराश केले.  शाहीनने १०-२-३५-४ अशी स्पेल टाकली. नसीमने ३६ धावांत ३ विकेट्स घेत भारताचा संपूर्ण संघ ४८.५ षटकांत २६६ धावांत तंबूत पाठवला. जसप्रीतने १६ धावा केल्या. India vs Pakistan Live Asia Cup Match

काय असेल नवीन लक्ष्य?४५ षटकांत २५४ धावा४० षटकांत २३९ धावा३० षटकांत २०३ धावा २० षटकांत १५५ धावा  

टॅग्स :एशिया कप 2023भारत विरुद्ध पाकिस्तान
Open in App