Join us

India vs Pakistan Live Scorecard : भारत-पाकिस्तान २०-२० मॅच? जाणून घ्या श्रीलंकेतील Live Update, कधी सुरू होणार सामना? 

India vs Pakistan Asia Cup 2023 Match Live ScoreCard Today : Pallekele स्टेडियमबाहेर भारत व पाकिस्तानचे चाहते भांगडा करत आहेत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 14:18 IST

Open in App

India vs Pakistan Asia Cup 2023 Match Live ScoreCard Today : Pallekele स्टेडियमबाहेर भारत व पाकिस्तानचे चाहते भांगडा करत आहेत... १ वाजेपर्यंत आकाश मोकळं होतं, परंतु अचानक काळे ढग जमा झाले अन् पावसाच्या सरी बसरल्या... ग्राऊड्समन तातडीने खेळपट्टीवर कव्हर टाकले... मॅच ऑफिशियल खेळपट्टीची पाहणी करायला आले... त्यामुळे चाहत्यांच्या चेहऱ्यावरील चिंता स्पष्ट दिसत होती... शेवटी हा भारत-पाकिस्तान सामना आहे आणि याची सर्वच आतुरतेनं वाट पाहत आहेत... सध्या मैदानावरील कव्हर्स हटवण्यात आले आहेत आणि पुन्हा एकदा सामनाधिकारी खेळपट्टीची पाहणी करत आहेत... 

पाकिस्तान अन् नेपाळ असे भारताचे दोन्ही सामने रद्द होणार; मग सुपर ४ मध्ये कसे पोहोचणार?

India vs Pakistan यांच्यातला हाय व्होल्टेज सामना Pallekele येथे खेळवला जाणार आहे. काल दोन्ही संघांतील खेळाडूनंनी मैदानावर कसून सराव केला. दव फॅक्टर महत्त्वाचा ठरणार असल्याने दोन्ही संघ सांयकाळच्या सत्रात शेजारी-शेजारी सराव करताना दिसले. यावेळी विराट कोहली, रोहित शर्मा यांनी पाकिस्तानी खेळाडूंशी गप्पाही मारल्या. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीत पडतोय. पण, मनात एक धाकधुक आहेच आणि ती म्हणजे मॅच कधी सुरू होईल. दोन वाजत्याच्या सुमारास मैदानावरील कव्हर्स काढले गेले आहेत आणि दोन्ही संघाचे खेळाडू मैदानावर सरावाला लागले आहेत.

पण, सायंकाळच्या सत्रात रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. जसजशी रात्र होईल तसा पावसाचा जोर वाढेल. अशा परिस्थितीत दोन्ही संघांमध्ये किमान २०-२० षटकांचा सामना खेळवण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे. सध्यातरी मॅच वेळेत ( ३ वाजता) सुरू होईल असे चित्र आहे.

टॅग्स :एशिया कप 2023भारत विरुद्ध पाकिस्तान
Open in App