India vs Pakistan Live Scorecard : पावसामुळे सामना रद्द! पाकिस्तान Super 4 मध्ये, तर टीम इंडियाचा मार्ग झालाय अवघड 

India vs Pakistan Asia Cup 2023 Match Live ScoreCard Today : भारत-पाकिस्तान यांच्यातला सामना पावसामुळे रद्द करावा लागला. भारताने विजयासाठी ठेवलेल्या २६७ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी पाकिस्तानला फलंदाजीची संधीच मिळाली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2023 10:01 PM2023-09-02T22:01:14+5:302023-09-02T22:01:53+5:30

whatsapp join usJoin us
india vs pakistan asia cup 2023 Match Live Score card Today : India Vs Pakistan called off due to rain, Both India and Pakistan will share the points.  Pakistan are now through to the Super Four round | India vs Pakistan Live Scorecard : पावसामुळे सामना रद्द! पाकिस्तान Super 4 मध्ये, तर टीम इंडियाचा मार्ग झालाय अवघड 

India vs Pakistan Live Scorecard : पावसामुळे सामना रद्द! पाकिस्तान Super 4 मध्ये, तर टीम इंडियाचा मार्ग झालाय अवघड 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Pakistan Asia Cup 2023 Match Live ScoreCard Today : भारत-पाकिस्तान यांच्यातल्या लढतीत पावसाचे वर्चस्व पाहायला मिळाले. भारत-पाकिस्तान सामन्याची हवा जेवढी सोशल मीडियावर होती. प्रत्यक्षात मैदानावर ५० टक्केही प्रेक्षक दिसले नाही. त्यात पावसाच्या खेळामुळे हरज असलेल्या प्रेक्षकांचीही निराशा झाली. रोहित, विराट हे स्टार फेल झाले. हार्दिक पांड्या व इशान किशन यांनी चांगली फटकेबाजी केली. पाकिस्तानच्या शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह व हॅरीस रौफ यांनी चांगला मारा केला. पण, पावसामुळे पाकिस्तानला फलंदाजीची संधीच मिळाली नाही. ९.५२ मिनिटांनी सामना रद्द करावा लागला. दोन्ही संघांना प्रत्येक १-१ गुण मिळाले.



भारताच्या डावानंतर जोरदार पाऊस सुरू झाला आणि संपूर्ण स्टेडियम कव्हर्सने झाकले गेले. ९ वाजता पावसाने विश्रांती घेतली अन् सामनाधिकारी मैदानाची पाहणी करायला पोहोचले. भारतीय खेळाडूही लगेच वॉर्म अप करण्यासाठी मैदानावर आले. पाकिस्तानसमोर ३६ षटकांत २२६ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवले गेले, परंतु पुन्हा पावसाच्या हजेरीमुळे मैदान झाकावे लागले. १०.२७ ही कट ऑफ वेळ ठरवण्यात आली आणि त्यानंतर सामना २० षटकांचा झाला असता. पण त्याधीच सामना रद्द झाला.


तत्पूर्वी, रोहित शर्मा ( ११), विराट कोहली ( ४), श्रेयस अय्यर ( १४) व शुबमन गिल ( १०) हे अपयशी ठरले. इशानने ८१ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांसह ८२ धावा, तर हार्दिकने ९० चेंडूंत ७ चौकार व १ षटकारांसह ८७ धावा केल्या. या दोघांनी १३८ धावांची भागीदारी केली. रवींद्र जडेजा ( १४), शार्दूल ठाकूर ( ३) यांनी निराश केले.  शाहीनने ४,तर नसीमने ३ विकेट्स घेतल्या. भारताचा संपूर्ण संघ ४८.५ षटकांत २६६ धावांत तंबूत पाठवला. जसप्रीतने १६ धावा केल्या. India vs Pakistan Live Asia Cup Match 


भारताचं नुकसान
हा सामना जिंकून भारताच्या खात्यात २ गुण झाले असते अन् सुपर ४ गटाच्या ते जवळ पोहोचले असते. पण, पाकिस्तानला १ गुण मिळाला अन् त्यांचे एकूण ३ गुण झाले. ते सुपर ४ मध्ये पोहोचले. पाकिस्तानने सलामीच्या लढतीत नेपाळवर २३८ धावांनी मोठा विजय मिळवला होता. भारताचा पुढील सामना ४ तारखेला नेपाळविरुद्ध आहे आणि त्यावरही पावसाचे सावट आहे. 

 

Web Title: india vs pakistan asia cup 2023 Match Live Score card Today : India Vs Pakistan called off due to rain, Both India and Pakistan will share the points.  Pakistan are now through to the Super Four round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.