मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना पावसामुळे राखीव दिवशी म्हणजेच आज खेळवण्यात आला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 46.1 षटकांत 5 बाद 211 धावा केल्या. त्यानंतर पावसानेच दमदार बॅटींग केली. बराच वेळ वाट पाहूनही पावसाचा जोर कायम राहिल्याने अखेरीस उपांत्य फेरीचा सामना राखीव दिवशी खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. आज 46.1 षटकापासूनच सामन्याला सुरुवात झाली. न्यूझीलंडने भारतासमोर 240 धावांचे लक्ष्य ठेवले. कर्णधार केन विलियम्सन आणि रॉय टेलर यांनी अर्धशतकी खेळी केली. विलियम्सनने 95 चेंडूंत 67 धावा केल्या. टेलरने 90 चेंडूंत 74 धावा केल्या.
बुधवारचा खेळ सुरू झाला तेव्हा किवी मोठी धावसंख्या उभारतील असे वाटले होते, परंतु रवींद्र जडेजानं त्यांना रोखले. रॉस टेलरला धावबाद केल्यानंतर जडेजानं किवींना आणखी एक धक्का दिला, भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर त्यानं टॉम लॅथमचा सुरेख झेल टिपला. त्यामुळे किवींना फार काही करता आले नाही. भुवीनं 10 षटकांत 43 धावा देत तीन विकेट घेतल्या.
सौरव गांगुली जेव्हा लक्ष्मण, तेंडुलकर, द्रविडला ट्रोल करतो...भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं समकालीन सहकारी खेळाडूंना ट्रोल केले. प्रतिस्पर्धी खेळाडूंना डिवचण्यासाठी संघातील खेळाडूंकडे विविध जबाबदारी सोपवत होतास का, या प्रश्नावर गांगुलीनं मजेशीर उत्तर दिलं. तो म्हणाला,''माझ्यावेळी संघात बरेच जंटलमन खेळाडू होते. जर मी राहुल द्रविडला प्रतिस्पर्धी खेळाडूला डिवचण्यास सांगितलं असतं तर त्याने शांतपणे नकार दिला असता. व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणाला असता की, मी माझ्या फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करतो. सचिन तेंडुलकरला असे सांगितले असते तर मिड ऑनवर उभा असलेल्या सचिनने मिडविकेटवरील खेळाडूकडे ती जबाबदारी सोपवली असती. पण, स्वतः काही केलं नसतं. त्यामुळे संघात बरीच समस्या होती. ही जबाबदारी केवळ हरभजन सिंग आणि सौरव गांगुलीच पार पाडत होते. कारण, सरदारजीला मी काही सांगितले तरी तो करायचा.''
रोहित शर्माकडे मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद का सोपवलं? सचिन तेंडुलकरनं सांगितलं कारण
मुंबई : भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा सध्या भलत्याच फॉर्मात आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत रोहितनं पाच शतकं झळकावली असून 647 धावांसह तो अव्वल स्थानावरही आहे. भारताकडून एकाच वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्याची संधी रोहितला आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याच्याकडून आणखी एका मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. तत्पूर्वी, तेंडुलकरनं रोहित शर्मालामुंबई इंडियन्सचे कर्णधारपद देण्याबाबत एक मोठा खुलासा केला.
तेंडुलकर म्हणाला,''2013मध्ये मी इंडियन प्रीमिअर लीगमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर कर्णधारपदाची जबाबदारी कोणाकडे सोपवावी, हा सर्वांनाच प्रश्न पडला होता. मुंबई इंडियन्सचे नेतृत्व अशा व्यक्तीच्या हाती सोपवायचे होते की तो संघासोबत दीर्घकाळ राहील. दर दोन वर्षांनी कर्णधारपदाचा उमेदवार शोधण्याची वेळ येण्यापासून आम्हाला टाळायची होती. त्यात रोहित हा सक्षम पर्याय आमच्यासमोर होता. त्याचे नेतृत्वगुण आपण पाहतोच आहोत. रोहितनेही त्याची निवड सार्थ ठरवली.''