Join us

India Vs New Zealand World Cup Semi Final : ओल्ड ट्रॅफर्डवरून आज एकही विमान उडणार नाही, जाणून घ्या कारण

India Vs New Zealand World Cup Semi Final : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील  उपांत्य फेरीचा सामना मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड येथे होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 14:51 IST

Open in App

मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील  उपांत्य फेरीचा सामना मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड येथे होणार आहे. या सामन्यात सुरक्षेच्या दृष्टीनं आयसीसीऩं एक फतवा काढला आहे. या सामन्या दरम्यान ओल्ड ट्रॅफर्डवरून एकही विमान नेण्यास मनाई करण्यात आलेली आहे. भारत-न्यूझीलंड सामन्याच्या वेळेस येते नो फ्लाईंग झोन जाहीर करण्यात आला आहे. 

भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना सुरु असताना एक विमान मैदानावरून गेले. या विमानावर ' जस्टीस फॉर काश्मीर' असे लिहिण्यात आले होते. या सामन्यात दुसऱ्यांदा एक हेलिकॉप्टर गेले आणि त्यावर 'इंडिया स्टॉप गेनोसाईड अँड फ्री कश्मीर' म्हणजेच ' भारताने काश्मीरमधील नरसंहार थांबवावा आणि ते मुक्त करावे' अशा आशयाचा संदेश लिहिण्यात आला होता. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचे चौथे षटक जसप्रीत बुमरा टाकत होता. त्यामुळे मैगानावरून पहिल्यांदा एक विमान गेले त्यावर ' जस्टीस फॉर काश्मीर' असे लिहिण्यात आले होते. त्यानंतर सामन्याच्या १७व्या षटकातहीअशीच एक घटना घडली. यावेळी एक हेलिकॉप्टर गेले आणि त्यावर 'इंडिया स्टॉप गेनोसाईड अँड फ्री कश्मीर' म्हणजेच ' भारताने काश्मीरमधील नरसंहार थांबवावा आणि ते मुक्त करावे' अशा आशयाचा संदेश लिहिण्यात आला होता. या साऱ्या प्रकरणाचा आयसीसीने निषेध केला आहे. ' ही गोष्ट विश्वचषकात दुसऱ्यांदाच घडली. त्यामुळे आम्ही निराश आहोत. आम्ही या गोष्टींची निंदा करतो.'

यापूर्वीही अशीच घटना घडली होती

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सामना सुरु होता. यावेळी मैदानावरून एक अनधिकृत विमान गेले. या विमानावर 'जस्टिस फॉर बलूचिस्तान' हे शब्द मोठ्या अक्षरांत लिहिले गेले होते. हे शब्द दोन्ही देशांतील चाहत्यांनी पाहिले आणि त्यांच्यामध्ये जोरदार मारामारी सुरु झाली. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये सामना रंगत आहे. पण हा सामना लीड्सच्या हेडिंग्ले मैदानात सुरु असताना दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्ये जोरदार हाणामारी पाहायला मिळाली. यावेळी दोन्ही देशांच्या चाहत्यांनी प्रतिस्पर्धी देशांच्या चाहच्यांवर चांगलेच हात साफ करून घेतले.पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना सुरळीत सुरु होता. पण यावेळी अशी एक घटना घडली की, या दोन्ही देशांतील चाहते एकमेकांवर तुटून पडले. या दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले. 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019न्यूझीलंडभारतभारत विरुद्ध न्यूझीलंड