माऊंट मोनगानुई, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारतीय संघ सध्या खेळाडूंमधील अष्टपैलूत्व बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळेच जे खेळाडू गोलंदाजी करू शकतात, त्यांना काही षटके टाकण्याचा विचार भारतीय संघ करत आहे. विश्वचषकासाठी भारतीय संघ असा अनोखा सराव करत आहे. तिसऱ्या सामन्यात भारताच्या अंबाती रायुडूला गोलंदाजी करण्याची संधी देण्यात आली. यावेळी त्याची गोलंदाजी अवैध असल्यामुळे त्याच्यावर आयसीसीने आक्षेप घेतला. रायुडूची गोलंदाजी शैली अवैध असल्यामुळे आयसीसीने एक गोलंदाज म्हणून त्याच्यावर निलंबन केले आहे. यानंतर रायुडूची चाचणी घेण्यात येणार आहे. रायुडू जर यामध्ये नापास ठरला तर त्याला यापुढे गोलंदाजी करता येणार नाही. पण यानंतरही रायुडूला जर बीसीसीआयने परवानगी दिली तर तो स्थानिक सामन्यांमध्ये गोलंदाजी करू शकतो.