IND vs NZ live T20I : OH NO! श्रेयस अय्यर स्वतःच्याच पायाने 'बेल्स' पाडल्या, किवींना दिली आयती विकेट; सूर्यकुमार यादवचे अर्धशतक 

India vs New Zealand T20I series: Live Scorecard - इशान किशन व रिषभ पंत यांना आज सलामीला संधी मिळाली, परंतु भारताला चांगली सुरुवात करून देण्यात ते अपयशी ठरले.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 01:42 PM2022-11-20T13:42:17+5:302022-11-20T13:44:17+5:30

whatsapp join usJoin us
India vs New Zealand T20I live scorecard update : OH NO! Unbelievable! Shreyas Iyer has been dismissed after trodding back onto his stumps, Suryakumar Yadav scored half century Video | IND vs NZ live T20I : OH NO! श्रेयस अय्यर स्वतःच्याच पायाने 'बेल्स' पाडल्या, किवींना दिली आयती विकेट; सूर्यकुमार यादवचे अर्धशतक 

IND vs NZ live T20I : OH NO! श्रेयस अय्यर स्वतःच्याच पायाने 'बेल्स' पाडल्या, किवींना दिली आयती विकेट; सूर्यकुमार यादवचे अर्धशतक 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs New Zealand T20I series: Live Scorecard - इशान किशन व रिषभ पंत यांना आज सलामीला संधी मिळाली, परंतु भारताला चांगली सुरुवात करून देण्यात ते अपयशी ठरले. रिषभ ( ६) पुन्हा चुकला, पण इशानने ( ३६) चांगला खेळ केला. सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) आणि श्रेयस यांनी आशेचा किरण दाखवला. पण, श्रेयस दुर्दैवी पद्धतीने बाद झाला. सूर्याने त्याचा फॉर्म कामय राखताना अर्धशतक झळकावले. 

संजू सॅमसनला डावलून रिषभ पंतला संधी, पठ्ठ्या ६ धावा करून परतला माघारी; पावसाची एन्ट्री, Video 
 
न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम साऊदीच्या गोलंदाजीवर रिषभने खणखणीत चौकार खेचला. तिसऱ्या षटकात साऊदीच्या गोलंदाजीवर स्लीप हटवली अन् इशानने हिच संधी साधताना लेट कट मारून चौकार मिळवला. पावसाचीही रिपरिप सुरू होती. पॉवर प्लेमधील अखेरच्या षटकात रिषभने ( ६) फटकेबाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु फर्ग्युसनच्या पहिल्याच चेंडूवर तो  झेलबाद झाला. टीम साऊदीने अप्रतिम रिटर्न कॅच घेताना भारताला ३६ धावांवर पहिला धक्का दिला. 

सूर्यकुमार यादवने फटकेबाजीने सुरुवात. इश सोढीने त्याच्या पहिल्याच षटकात इशानला पायचीत केले होते, परंतु भारतीय फलंदाजाने DRS घेतला अन् मैदानावरील अम्पायरला निर्णय बदलावा लागला. चेंडू स्टम्पच्या अगदी इंचभर जवळून जाताना रिल्पेत दिसला. पण, सोढीने पुढच्या षटकात इशानला माघारी पाठवला. ३१ चेंडूंत ३६ धावा ( ५ चौकार व १ षटकार) करणाऱ्या इशानचा झेल साऊदीने टिपला. श्रेयस अय्यरने पहिल्याच चेंडूवर सरळ चौकार खेचला आणि भारताने १० षटकांत २ बाद ७५ धावा केल्या होत्या. 

सूर्याने धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला आणि श्रेयसनेही त्याला साथ दिली. या दोघांनी सोढीच्या षटकात १५ धावा चोपल्या. या दोघांच्या २१ चेंडूंवरी ३९ धावांच्या भागीदारीचा शेवट दुर्दैवी ठरला. श्रेयस अय्यर ( १३) हिट विकेट झाला. फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर श्रेयसने मागे येऊन फटका मारला, परंतु त्याचा पाय यष्टींवर आदळला अन् बेल्स पडल्या. ( Hit-wicket: Shreyas Iyer dismissed for 13 from 9 balls.)

 
लोकेश राहुल, हर्षल पटेल व हार्दिक पांड्या यांच्यानंतर ट्वेंटी-२०त हिटविकेट ठरणारा श्रेयस चौथा भारतीय फलंदाज ठरला. सूर्यकुमारने 32 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: India vs New Zealand T20I live scorecard update : OH NO! Unbelievable! Shreyas Iyer has been dismissed after trodding back onto his stumps, Suryakumar Yadav scored half century Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.