India vs New Zealand 2nd ODI Live Streaming:शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने चुरशीच्या झालेल्या पहिल्या वनडेत चार विकेट्सने विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेतली आहे. आता बुधवारी राजकोट येथे होणाऱ्या दुसऱ्या वनडेत भारतीय संघ मालिका विजयाच्या इराद्याने मैदानात उतरेल. दुसऱ्या बाजूला पाहुणा न्यूझीलंड संघ मालिकेत बरोबरी साधण्यासाठी जोर लावेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विराट जलवा दिसला; आता हिटमॅन रोहितच्या हिट शोवर असतील नजरा
पहिल्या सामन्यात विराट कोहली शतकापासून थोडक्यात दूर राहिला, मात्र त्याने ९१ चेंडूतील ९३ धावांच्या खेळीसह आपला फॉर्म कायम असल्याचे दाखवून दिले. पुन्हा त्याच्याकडून अशाच दमदार कामगिरीची अपेक्षा असेल. हिटमॅन रोहित शर्मा पहिल्या सामन्यात स्वस्तात माघारी फिरला होता. तो हिट शो दाखवणार का? तेही पाहण्याजोगे असेल.
T20 Word Cup: ४ परदेशी खेळाडूंना भारताचा व्हिसा नाकारला; 'पाकिस्तान कनेक्शन' पडले महागात
भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा वनडे कधी आहे?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा वनडे सामना बुधवारी, १४ जानेवारी रोजी खेळवला जाईल. भारतीय प्रमाण वेळेनुसार, दुपारी १:३० वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.
दुसरा वनडे कुठे खेळवला जाणार आहे?
हा सामना निरंजन शाह स्टेडियम, राजकोट येथे होणार आहे.
नाणेफेक कधी होणार?
दुसऱ्या वनडेसाठी भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी १ वाजता दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात उतरतील.
सामना कुठे पाहता येईल?
हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केला जाईल. तसेच JioHotstar अॅपवर लाईव्ह स्ट्रीमिंगही उपलब्ध असेल.
भारत:
रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, केएल राहुल (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, आयुष बदोनी, यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल.
न्यूझीलंड:
डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, विल यंग, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल हे (यष्टीरक्षक), मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), झॅकरी फॉल्क्स, क्रिस्टियन क्लार्क, काइल जेमिसन, आदित्य अशोक, जेडन लेनॉक्स, निक केली, जोश क्लार्कसन, मायकेल रे