कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा दिलासा, इशांत शर्मा फिटनेस टेस्टमध्ये पास 

न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा दिलासा मिळाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 22:40 IST2020-02-15T22:40:00+5:302020-02-15T22:40:39+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
India VS New Zealand : Ishant Sharma passed the fitness test before the Test series against New zealand | कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा दिलासा, इशांत शर्मा फिटनेस टेस्टमध्ये पास 

कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा दिलासा, इशांत शर्मा फिटनेस टेस्टमध्ये पास 

नवी दिल्ली - न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा दिलासा मिळाला आहे. भारताचा अनुभवी गोलंदाज इशांत शर्मा फिटनेस टेस्टमध्ये पास झाला आहे. त्यामुळे तो 21 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीपूर्वी भारतीय संघात दाखल होणार आहे. 

इशांत शर्माने फिटनेस चाचणी पास केली आहे. आता तो भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघात दाखल होईल, असे सूत्रांनी सांगितले. टी-20 मालिकेत 5-0 ने विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाला एकदिवसीय मालिकेत मात्र पराभव पत्करावा लागला होता. आता 21 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करण्याचे आव्हान भारतीय संघासमोर आहे. 



विदर्भाविरुद्ध रणजी करंडक सामना खेळत असताना इशांत शर्माला दुखापत झाली होती. त्यानंतर वैद्यकीय तपासणी झाल्यावर त्याला सहा आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला होता.  

Web Title: India VS New Zealand : Ishant Sharma passed the fitness test before the Test series against New zealand