भारत-न्यूझीलंड यांच्यातील चौथा टी-२० सामना विशाखापट्टणमच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. मालिका आधीच गमावलेल्या न्यूझीलंडच्या संघाने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ७ बाद २१५ धावा करत टीम इंडियासमोर २१६ धावांचे टार्गेट सेट केल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात रिंकू सिंह याने क्षेत्ररक्षणावेळी खास विक्रमाला गवसणी घातल्याचे पाहायला मिळाले. आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात एका डावात सर्वाधिक झेल घेण्याच्या अजिंक्य रहाणे याच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली. इथं जाणून घेऊयात या खास रेकॉर्डसंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रिंकूच्या नावे झाला कॅचेसच्या अनोख्या चौकाराचा विक्रम
रिंकू सिंह याने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात डेवॉन कॉन्वेचा झेल टिपत टीम इंडियाला पहिले यश मिळवून देण्यात योगदान दिले. टिम सिफर्टचा झेलही त्यानेच टिपला. ग्लेन फिलिप्स २४ (१६) आणि झॅक फॉल्केस १३ (६) यांचे झेल टिपत एका डावात चार झेल पकडण्याचा खास विक्रम नोंदवणाा तो अजिंक्य रहाणेनंतर दुसरा भारतीय खेळाडू ठरला.
Tim Seifert चं विक्रमी अर्धशतक; २०० च्या स्ट्राइक रेटसह केन विल्यमसन-रॉस टेलरची बरोबरी अन्...
याआधी रहाणेनं इंग्लंडविरुद्ध साधला होता असा डाव
अजिंक्य रहाणे याने १०१४ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या एजबेस्टनच्या मैदानात रंगलेल्या टी-२० सामन्यात चार झेल टिपण्याचा पराक्रम केला होता. या सामन्यात रहाणेनं इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय ८ (१०), एलेक्स हेल्स ४० (२५) या दोन सलामीवीरांशिवाय इयॉन मॉर्गन ७१(३१) आणि मोईन अली यांचे झेल टिपले होते. जवळपास १२ वर्षांनी रिंकू सिंह याने या कामगिरीची पुनरावृत्ती करुन सर्वांचे लक्षवेधून घेतल्याचे पाहायला मिळाले.
फलंदाजीतही चांगली सुरुवात मिळाली, पण...
धावांचा पाठलाग करताना रिंकू सिंह याला चौथ्या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाली. आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी फिरल्यावप रिंकून ३० चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३९ धावांचे योगदान दिले. ही खेळी तो आणखी मोठी करेल, असे वाटत असताना फ्लॉक्सनं त्याला पायचित केले.
Web Summary : Rinku Singh matched Ajinkya Rahane's record by taking four catches in a T20I against New Zealand. He is the second Indian to achieve this milestone. He also contributed 39 runs with the bat during India's chase.
Web Summary : रिंकू सिंह ने न्यूजीलैंड के खिलाफ टी20 मैच में चार कैच लेकर अजिंक्य रहाणे के रिकॉर्ड की बराबरी की। वह यह उपलब्धि हासिल करने वाले दूसरे भारतीय हैं। भारत की पारी के दौरान उन्होंने बल्ले से भी 39 रनों का योगदान दिया।