India vs New Zealand 1st ODI Virat Kohli Need 94 Runs To Break Sachin Tendulkar Record : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय द्विपक्षीय मालिकेत विराट कोहली पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात उतरल्याचे पाहायला मिळेल. रविवारी ११ जानेवारीपासून रंगणाऱ्या या वनडे मालिकेत किंग कोहलीच्या निशाण्यावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आणखी एक विक्रम मोडण्याची संधी असेल. एक मोठा डाव खेळून तो न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत किंग ठरू शकतो. इथं जाणून घेऊयात त्याला विराट कोहलीला खुणावत असलेल्या खास विक्रमाबद्दलची सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम धोक्यात!
भारत-न्यूझीलंड वनडे सामन्यांत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिन तेंडुलकरनं आपल्या कारकिर्दीत न्यूझीलंडविरुद्ध ४२ वनडे सामन्यांत १७५० धावा केल्या आहेत. यात त्याच्या खात्यात ५ शतके आणि ८ अर्धशतकांची नोंद आहे. त्याचा हा विक्रम मागे टाकण्याची विराट कोहलीला संधी आहे.
Virat Kohli Viral Photo: चक्क बच्चे कंपनीसोबत किंग कोहलीला भेटायला आला 'चिकू' अन्...
विक्रमी कामगिरीसाठी किंग कोहलीला फक्त एवढ्या धावांची गरज
विराट कोहली हा सध्या कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. आतापर्यंत त्याने न्यूझीलंड विरुद्धच्या वनडेत ३१ सामन्यांत ६ शतकाच्या मदतीने १६५७ धावा केल्या आहेत. सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढण्यासाठी त्याला फक्त ९४ धावांची गरज आहे. एका मोठ्या खेळीसह तो न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय ठरू शकतो. न्यूझीलंडकडून भारताविरुद्ध वनडेत सर्वाधिक धावा रॉस टेलर याने केल्या आहेत. त्याने ३५ सामन्यांत १३८५ धावा केल्या आहेत. तर केन विल्यमसनने ३१ सामन्यांत १२३९ धावा केल्या आहेत.
विराट कोहली करिअरच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये
टी-२० पाठोपाठ कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन फक्त वनडेवर फोकस करणारा विराट कोहली सध्या सातत्यपूर्ण धमाकेदार कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. मागील वर्षी विराटने वनडेत १३ डावात ६५.१० च्या सरासरीसह ३ शतके आणि ४ अर्धशतकांचा मदतीने ६५१ धावा केल्या. नव्या वर्षात तो यापेक्षा मोठा धमाका करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.