Rohit Sharma Becomes First Batter Complete 650 Sixes In International Cricket : न्यूझीलंड विरुद्धच्या वडोदरा येथील वनडे सामन्यात हिटमॅन रोहित शर्मानं नवा इतिहास रचला आहे. पाहुण्या संघाने दिलेल्या ३०१ धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मानं युवा कर्णधार शुभमन गिलच्या साथीनं भारतीय संघाच्या डावाची सुरुवात केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रोहित शर्मानं छोट्याखानी खेळीतील दोन उत्तुंग षटकारासह साधला मोठा डाव
या सामन्यात २९ चेंडूत २६ धावांवरच त्याची खेळीला ब्रेक लागला. पण छोट्याखानी खेळीतही त्याने सर्वाधिक सिक्सरसह मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. रोहित शर्मानं पहिल्या वनडे सामन्यात ३ चौकारासह २ षटकार मारले. यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने ६५० षटकारांचा आकडा पार केला. अशी कामगिरी करणारा तो क्रिकेट जगतातील पहिला फलंदाज ठरला आहे.
IND vs NZ : डॉक्टर तरुणीची रोहितसाठी हटके फलकबाजी; मैत्रिणीने वामिकाचा उल्लेख करत विराटकडे केली 'ही' मागणी
वनडेतील सिक्सर किंग आहे हिटमॅन रोहित
रोहित शर्मानं आतापर्यंतच्या आपल्या वनडे कारकिर्दीत ३५७ षटकार मारले आहेत. यातील ३२९ षटकार त्याने सलामीवीराच्या रुपात मारले आहेत. या यादीत ख्रिस गेल ३२८ षटकारांसह दुसऱ्या स्थानावर असून त्यानंतर सनथ जयसूर्या (२६३), मार्टिन गप्टिल (१७४) आणि सचिन तेंडुलकर (१६७) या दिग्गजांचा नंबर लागतो.
हिटमॅन रोहितनं कोणत्या फॉरमॅटमध्ये किती षटकार मारले
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा ६५० षटकार मारणारा पहिला फलंदाज ठरला आहे. यात वनडेत त्याच्या नावे ३५७ षटकारांची नोंद आहे. याशिवाय आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये त्याच्या खात्यात २०५ तर कसोटीत ८८ षटकारांची नोंद आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याच्या जवळपासही कोणी दिसत नाही. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ख्रिस गेलच्या खात्यात ५५३ षटकार आहेत. याशिवाय तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या पाकिस्तानचा शाहीद आफ्रिदीच्या नावे आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४७६ षटकार आहेत.