India vs Ireland 1st T20 I: नाणेफेक होऊन जवळपास तीन तास उलटूनही भारत-आयर्लंड सामना सुरू झालेला नाही. पावसाचा लंपडाव सुरू आहे आणि खेळाडू खेळपट्टीवर येताच पुन्हा पाऊस एन्ट्री घेतानाचे चित्र सध्या दिसतेय.. दोन-तीन वेळा सूर्याने तोंड दाखवल्यानंतरही क्षणार्धात लगेच पाऊस पडतोय. त्यामुळे सामन्याला विलंब झाला आहे. पण, आताच्या अपडेट्सनुसार पावसाने विश्रांती घेतली आहे आणि सामना सुरू होण्याची वेळ ठरली आहे.
आयर्लंडविरुद्धच्या दोन ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेत हार्दिक पांड्याच्या खांद्यावर टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उम्रान मलिकला ( Umran Malik) पदार्पणाची अखेर संधी मिळाली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याला पाचही सामन्यात बाकावर बसवून ठेवले होते.परवेझ रसूलनंतर
भारताकडून खेळणारा मलिक हा जम्मू-काश्मीरचा दुसरा खेळाडू ठरला. दरम्यान, पावसामुळे सामना उशीरा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण, लगेच ऊन आले अन् नाणेफेक झाली. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि पुन्हा पावसामुळे तीन तासांचा खेळ वाया गेला.
आता पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली आहे आणि मैदानावरील कव्हर्स काढले गेले आहेत. खेळपट्टी सुकवण्याचं काम जोरात सुरू असून ११.२० मिनिटांनी सामन्याला सुरुवात होणार आहे. ही लढत १२-१२ षटकांची होणार असून १ ते ४ षटकं पॉवर प्ले राहणार आहे. तीन गोलंदाजांना प्रत्येकी दोन, तर दोन गोलंदाजांना प्रत्येकी ३ षटकं फेकता येणार आहेत.
![]()
भारतीय संघ - ऋतुराज गायकवाड, इशान किशन, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल. उम्रान मलिक