Join us  

India vs England: भारत इंग्लंडमध्ये पराभूत का झाला, कपिल देव यांनी केली समीक्षा

India vs England: या मालिकेमध्ये भारताचं नेमकं काय चुकलं, याची समीक्षा केली आहे ती भारताचे माजी विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांनी.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2018 3:44 PM

Open in App
ठळक मुद्दे भारताच्या एका खेळाडूने चांगली कामगिरी केली की त्याला दुसऱ्या खेळाडूकडून सुयोग्य साथ मिळाली नाही, असे कपिल यांनी सांगितले.

नवी दिल्ली, भारत विरुद्ध इंग्लंड : भारतीय संघाने इंग्लंडमधली कसोटी मालिका गमावली आहे. या मालिकेमध्ये भारताचं नेमकं काय चुकलं, याची समीक्षा केली आहे ती भारताचे माजी विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांनी.

भारताच्या कामगिरीबाबत कपिल म्हणाले की, " इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताची सांघिक कामगिरी पाहायला मिळाली नाही. भारताच्या एका खेळाडूने चांगली कामगिरी केली की त्याला दुसऱ्या खेळाडूकडून सुयोग्य साथ मिळाली नाही. त्यामुळेच भारताला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत यश मिळवता आले नाही. " 

भारताने बऱ्याच संधी गमावल्याभारताने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत बऱ्याच संधी गमावल्या. आपण जर चौथ्या सामन्याचा विचार केला, तर हा सामना भारताने जिंकलाच पाहिजे होता. कारण भारताने इंग्लंडची 6 बाद 86 अशी दयनीय अवस्था केली होती. त्यावेळी हा सामना भारताच्या हातामध्ये होता. पण भारताने त्यावेळी वरचढ होण्याची संधी गमावली आणि त्यांना पराभव सहन करावा लागला, असे कपिल यांनी सांगितले.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडकपिल देवभारतीय क्रिकेट संघ