मुंबई : ‘चेतेश्वर पुजाराने एका विशिष्ट पद्धतीने खेळण्याच्या जोरावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वत:ची वेगळी जागा तयार केली आहे, जर संघाला त्याच्या पद्धतीवर विश्वास नसेल, तर संघाने त्याच्या जागी इतर कोणत्यातरी खेळाडूला खेळवावे,’ असे सांगत भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी पुजाराचे समर्थन करताना त्याच्यावर टीका करणाऱ्यांना उत्तर दिले.
भक्कम बचाव आणि उत्कृष्ट फलंदाजी तंत्रासाठी ओळखल्या जाणाऱ्या पुजारावर गेल्या काही सामन्यांतील सातत्याने होणाऱ्या संथ फलंदाजीमुळे टीका होत आहे. अनेक चेंडू निर्धाव खेळल्याने संघाच्या धावगतीवर, तसेच धावसंख्येवर परिणाम होत असल्याचीही त्याच्यावर टीका झाली.
सोमवारी प्रसारमाध्यमांशी ऑनलाईन संवाद साधलेल्या गावसकर यांनी पुजाराचे समर्थन केले. ते म्हणाले की, ‘पुजाराने आपल्या विशिष्ट तंत्राच्या जोरावर वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याला स्वत:च्या पद्धतीवर, तंत्रावर विश्वास ठेवावा लागेल.असे सांगत भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी पुजाराचे समर्थन करताना त्याच्यावर टीका करणाऱ्यांना उत्तर दिले.
भक्कम बचाव आणि उत्कृष्ट फलंदाजी तंत्रासाठी ओळखल्या जाणाऱ्या पुजारावर गेल्या काही सामन्यांतील सातत्याने होणाऱ्या संथ फलंदाजीमुळे टीका होत आहे. अनेक चेंडू निर्धाव खेळल्याने संघाच्या धावगतीवर, तसेच धावसंख्येवर परिणाम होत असल्याचीही त्याच्यावर टीका झाली.
सोमवारी प्रसारमाध्यमांशी ऑनलाईन संवाद साधलेल्या गावसकर यांनी पुजाराचे समर्थन केले. ते म्हणाले की, ‘पुजाराने आपल्या विशिष्ट तंत्राच्या जोरावर वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याला स्वत:च्या पद्धतीवर, तंत्रावर विश्वास ठेवावा लागेल.