Join us

India vs England Test:  भारताचा संघ बालिश आहे; इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूंनी उडवली भारतीय संघाची खिल्ली

इंग्लंडचा संघ चांगलाच परीपक्व आहे, पण दुसरीकडे भारताचा संघ बालिश वाटत आहे, असे नासिर हुसेन यांनी म्हटले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 13:48 IST

Open in App
ठळक मुद्देइंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूंनी भारतीय संघाची खिल्ली उडवायला सुरुवात केली आहे.

लंडन : भारताला इंग्लंडविरुद्धच्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला. दुसऱ्या सामन्यात तर भारताला लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. त्यानंतर इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूंनी भारतीय संघाची खिल्ली उडवायला सुरुवात केली आहे.

इंग्लंडचे माजी कर्णधार नासिर हुसेन म्हणाले की, " सध्या सुरु असलेल्या कसोटी मालिकेत भारताने युवा खेळाडूंचा संघ पाठवला आहे, असेच वाटत आहे. कारण इंग्लंडच्या संघासमोर त्यांच्याकडून कोणताच प्रतिकार होताना दिसत नाही. इंग्लंडचा संघ चांगलाच परीपक्व आहे, पण दुसरीकडे भारताचा संघ बालिश वाटत आहे. "

इंग्लंडचे माजी महान फलंदाज जेफ्री बॉयकॉट यांनी सांगितले की, " इंग्लंड दौऱ्यावर येण्यापूर्वी भारतीय संघ आत्ममग्न होता. त्यांच्यामध्ये अहंकार ठासून भरला होता. पण इंग्लंडमध्ये कसोटी सामने खेळताना त्यांची ससेहोलपट झाली आहे. भारतीय संघ फक्त पाटा खेळपट्टीवरच शेर आहे. पाटा खेळपट्टीवरच ते जिंकू शकतात. पण त्यांच्या दुर्देवाने इंग्लंडमध्ये पाटा खेळपट्टी पाहायला मिळत नाही. " 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडक्रिकेटभारत