Join us

India vs England Test: भारतीय संघ लढला नाही म्हणूनच हरला, वीरेंद्र सेहवागची खरमरीत टीका

पराभवानंतर भारताचा माजी धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवागने खरमरीत टीका केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 15:50 IST

Open in App
ठळक मुद्देसेहवागने दुसरा सामना झाल्यावर एक ट्विट केले आहे.

नवी दिल्ली : भारतालाइंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात एक डाव आणि 159 धावांनी मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. या सामन्यात भारताचे फलंदाज आणि गोलंदाज सपशेल अपयशी ठरले होते. या पराभवानंतर भारताचा माजी धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवागने खरमरीत टीका केली आहे.

सेहवागने दुसरा सामना झाल्यावर एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये सेहवागने लिहिले आहे की, " दुसऱ्या सामन्यात भारताकड़ून निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. जेव्हा आपला संघ पराभूत होतो, तेव्हा त्याला पाठिंबा द्यायचा असतो. पण दुसऱ्या सामन्यातील पराभव हा लाजीरवाणा होता. या सामन्यात भारतीय संघ लढला नाही म्हणूनच हरला." 

सेहवागने केलेले ट्विट पाहा

टॅग्स :विरेंद्र सेहवागक्रिकेटभारतइंग्लंड