Join us

India vs England Test: पती, पत्नी और शॉपिंग... बर्मिंगहॅमच्या मॉलमध्ये विराट-अनुष्काची खरेदी!

India vs England Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना बुधवारपासून सुरू होत आहे. BCCI ने जाहीर केलेल्या नियमानुसार मालिकेतील पहिले दोन आठवडे भारतीय खेळाडूंना आपापल्या पत्नीला भेटता येणार नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 16:02 IST

Open in App

लंडन - भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना बुधवारपासून सुरू होत आहे. BCCI ने जाहीर केलेल्या नियमानुसार मालिकेतील पहिले दोन आठवडे भारतीय खेळाडूंना आपापल्या पत्नीला भेटता येणार नाही. त्यानंतर मालिकेतील कोणतेही 14 दिवस खेळाडू पत्नीला भेटू शकतील. त्यामुळेच सामन्याच्या आदल्या दिवशी भारताचा कर्णधार विराट कोहली याने पत्नी अनुष्का शर्मासह बर्मिंगहम येथील मॉलमध्ये शॉपिंग केली. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

इंग्लंडविरूद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी बर्मिंगहम येथेली एडबॅस्टन स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. सामन्यापूर्वी विराटने पत्नी व बॉलिवूड अभिनेत्री अनुष्कासह शॉपिंग केली. कर्णधार विराटने निळी हुडी आणि शॉर्ट्स घातली होती. तो अनुष्का शर्माच्या मागे उभा असलेला पाहायला मिळत आहे. इन्स्टग्रामवरील व्हिडीओनुसार अनुष्का पर्फ्युम घेत असल्याचे दिसत आहे. 

2014च्या इंग्लंड दौ-यात भारतीय संघात विराटचा सहभाग होता. भारतीय संघाला त्या दौ-यात 1-3 असा पराभव पत्करावा लागला होता. कोहलीला या मालिकेत अपयश आले होते आणि त्याने 13.40च्या सरासरीने एकूण 134 धावाच केल्या. दोन वेळा विराटला तर धावांचे खातेही उघडता आले नाही.  इंग्लंड आणि भारत यांच्यात आतापर्यंत 117 कसोटी सामने झाले असून त्यात इंग्लंडने 43 विजय मिळवले आहेत. भारताला 25 सामने जिंकण्यात यश आले आहेत आणि 49 सामने अनिर्णीत सुटले आहेत.

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्माभारत विरुद्ध इंग्लंडक्रिकेटक्रीडाबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघ