India vs England Test Head to Head Record :आयपीएल स्पर्धेची सांगता होताच भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. २० जून पासून भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे. या दौऱ्याआधी रोहित शर्मा पाठोपाठ विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यामुळे टीम इंडियाचे टेन्शन निश्चितच वाढले आहे. इंग्लंड विरुद्धचा भारतीय संघाचा कसोटीतील रेकॉर्ड्स त्यात आणखी भर घालतो. दोन अनुभवी दिग्गजांची उणीव भरून काढण्यासाठी बीसीसआय निवड समिती नव्या कॅप्टनसह काही नव्या चेहऱ्यांनाही संधी देईल, अशी अपेक्षा आहे. इथं एक नजर टाकुयात भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटीतील रेकॉर्ड्सवर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारत की इंग्लंड.. कसोटीत कोण ठरलंय भारी?
भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामना १९३२ मध्ये खेळवण्यात आला होता. तेव्हापासून आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये १३६ कसोटी सामने खेळवण्यात आले असून यात ३५ सामन्यात भारतीय संघ जिंकला असून ५१ सामन्यात इंग्लंडने बाजी मारलीये. दोन्ही संघातील ५० सामने हे अनिर्णित राहिल्याचा रेकॉर्ड आहे.
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
विराट कोहली आणि रोहित शर्मानं वाढवलंय टेन्शन
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालीच भारतीय संघ इंग्लंड दौरा करेल, असे वाटत असताना रोहित शर्मानं कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याच्यापाठोपाठ पाचव्या दिवशी विराट कोहलीनं पेपर टाकला अर्थात त्यानेही कसोटीतून निवृत्ती घेतली. या दोघांनी अचान घेतलेल्या निर्णयामुळे टीम इंडियाचे टेन्शन वाढले आहे. एकाच वेळी दोघांची उणीव भरून काढत इंग्लंडच मैदान मारणं ही काही सोपी गोष्ट नसेल.
गिल, बुमराहसह या खेळाडूंवर असेल मोठी जबाबदारी
अनुभवाची कमी इंग्लंडच्या विजयाची हमी ठरणार नाही यासाठी बीसीसीआय निवड समिती या दौऱ्यावर संघ निवड करताना कुणाला संधी देणार ते पाहण्याजोगे असेल. शुबमन गिल हा भारतीय कसोटी संघाचा नवा कर्णधार असेल, अशी चर्चा रंगताना दिसत आहे. काही दिग्गज क्रिकेटर्सं जसप्रीत बुमराहच्या बाजूनं बॅटिंग करताना दिसते. याशिवाय श्रेयस अय्यरसह या कसोटी मालिकेत करूण नायरही भारतीय संघात कमबॅक करेल, अशी आशा आहे.