Join us

India vs England Test: विराट कोहली पूर्ण फिट नसता तरी मी त्याला खेळवले असते- सुनील गावस्कर

भारताचे माजी सुनील गावस्कर यांनी विराट कोहली पूर्ण फिट नसता तरी मी त्याला खेळवले असते, असे म्हणत स्ट्रेट ड्राइव्ह लगावला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 16:00 IST

Open in App
ठळक मुद्देविराट सध्याच्या घडीला पाठिच्या दुखण्याने त्रस्त आहे.

लंडन : भारताचा कर्णधार विराट कोहली सध्याच्या घडीला पूर्णपणे फिट दिसत नाही. त्यामुळे तो तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार की नाही, याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. पण भारताचे माजी सुनील गावस्कर यांनी विराट कोहली पूर्ण फिट नसता तरी मी त्याला खेळवले असते, असे म्हणत स्ट्रेट ड्राइव्ह लगावला आहे.

विराट सध्याच्या घडीला पाठिच्या दुखण्याने त्रस्त आहे. पाठिच्या दुखण्यामुळे विराट सामन्याच्या चौथ्या दिवशी क्षेत्ररक्षण करायला मैदानात उतरला नव्हता. त्याचबरोबर फलंदाजीसाठीही तो उशिरा मैदानात आला होता. त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यात तो खेळणार की नाही, याबद्दल संभ्रम आहे.

याबाबत गावस्कर म्हणाले की, " मी जर भारताचा कर्णधार असतो आणि कोहली जर शंभर टक्के फिट नसता तरीदेखील मी त्याला खेळवले असते. विराट 50 टक्के फिट असला असता तरी मला चालले असते. कारण भारतासाठी तो फार महत्त्वाचा खेळाडू आहे. त्यामुळे तो संघात असायला हवा. "

टॅग्स :सुनील गावसकरविराट कोहलीभारतइंग्लंड