India vs England T20I, Eden Garden Pitch Report : भारत-इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या द्विपक्षीय मालिकेतील पहिला टी-२० सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्सच्या मैदानात रंगणार आहे. कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर छोट्या फॉर्मेटमध्ये मोठा धमाका करेल? अशी आशा आहे. सूर्यकुमारच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने सातत्याने दमदार कामगिरी करून दाखवली आहे. पण यावेळी इंग्लंड घरच्या मैदानात टीम इंडियासमोर तगडे आव्हान देऊ शकतो. दोन्ही संघातील तगड्या खेळाडूंसह मॅचमध्ये खेळपट्टीचा रोलही महत्त्वाचा असतो. इथं जाणून घेऊया ईडन गार्डन्सची ती खेळपट्टी कुणाला देईल साथ? यासंदर्भातील खास गोष्ट
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ती फलंदाजाला साथ देईल की, गोलंदाजांना?
ईडन गार्डन्सच्या मैदानावर रंगणाऱ्या टी-२० सामन्यात सूर्यकुमार यादव आणि जोस बटलर दोन्ही कॅप्टन टॉस जिंकून 'दव' फॅक्टर (धुक्याचा प्रभाव) पाहता पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेण्याला पसंती देतील. जशी जशी मॅच पुढे सरकेल तस तसे गोलंदाजांना परिस्थितीत कठीण होईल. याशिवाय ईडन गार्डन्सची बाउंड्री छोटी असल्यामुळे फलंदाजांसाठी इथं चांगली संधी असेल.
या मैदानातील भारतीय संघाची टी-२० तील सर्वोच्च धावसंख्या
आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात ईडन गार्डन्सच्या मैदानात भारतीय संघाची सर्वोच्च धावसंख्या ५ बाद १८६ अशी राहिली आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडियाने ही कामगिरी नोंदवली होती. टॉस गमावल्यावर पहिल्यांदा बॅटिंग करताना भारतीय संघाने ही धावसंख्या उभारली होती. धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ ३ विकेट्सच्या मोबदल्यात १७८ धावांपर्यंतच पोहचू शकला होता.
"हिरवे हिरवे गार गालीचे...." हा सीन, पण...
ईडड गार्डन्सच्या मैदानात देशांतर्गत क्रिकेटमधील वेगवेगळ्या गटातील मॅचेस खेळवण्यात आल्या आहेत. त्यामुळे खेळपट्टीवर फार काही नवी गोष्ट करण्यात आल्याचे दिसत नाही. पण पिच रिपोर्ट्सनुसार, क्टुयरेटर सुझान मुखर्जी यांनी अनुकूल ट्रॅक तयार करण्यावर भर दिला आहे. खेळपट्टीवर गोलंदाजांना मदत मिळावी, यासाठी थोडं गवतही ठेवण्यात आले आहे. "हिरवे हिरवे गार गालीचे...." हा सीन गोलंदाजांसाठी निश्चित फायद्याचा असतो. पण सूर्यास्त झाल्यावर दव पडत असल्यामुळे गोलंदाजांसाठी परिस्थितीत मुश्किल होऊ शकते.
भारत-इंग्लंड यांच्यातील टी-२० रेकॉर्ड
- एकूण सामने २४
- भारत १३ विजय
- इंग्लंड ११ विजय