Join us

Alastair Cook Retirement: कुकला चाहत्यांसह भारतीय संघाकडून मानवंदना

Alastair Cook Retirement: कुकने 12 वर्षांपूर्वी भारताबरोबरच कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आणि आता त्याची निवृत्तीही भारताबरोबरच्या सामन्यातून होत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2018 16:45 IST

Open in App
ठळक मुद्देभारताचा कर्णधार विराट कोहलीने कुकबरोबर हस्तांदोलन केले आणि अखेरच्या सामन्यासाठी त्याला शुभेच्छा दिल्या.

लंडन, भारत विरुद्ध इंग्लंड : आपला अखेरचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरलेल्या अॅलिस्टर कुकला चाहत्यांसह भारतीय संघानेही यावेळी मानवंदना दिली. कुकने 12 वर्षांपूर्वी भारताबरोबरच कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आणि आता त्याची निवृत्तीही भारताबरोबरच्या सामन्यातून होत आहे. 

कुकला मानवंदना देताना चाहते आणि भारतीय संघ

कुक मैदानात येण्यापूर्वी भारतीय संघ मैदानात उभे होते. कुक जेव्हा मैदानात उतरला तेव्हा दोन्ही बाजूंना उभे राहून भारतीय संघाने कुकला मानवंदना दिली. भारताचा कर्णधार विराट कोहलीने कुकबरोबर हस्तांदोलन केले आणि अखेरच्या सामन्यासाठी त्याला शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडअॅलिस्टर कुक