IND vs ENG: टीम इंडियाच्या ओपनर्सनं २०११ च्या वर्ल्डकपनंतर पहिल्यांदाच केली अशी कामगिरी, मिळवली वाहवा!

IND vs ENG: रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) यांनी पहिल्या विकेटसाठी १०३ धावांची भागीदारी रचली. रोहित-धवन जोडीनं या कामगिरीसह काही रेकॉर्ड देखील आपल्या नावावर केले आहेत. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 04:03 PM2021-03-28T16:03:17+5:302021-03-28T16:04:31+5:30

whatsapp join usJoin us
india vs england rohit sharma and shikhar creates record during third odi against england | IND vs ENG: टीम इंडियाच्या ओपनर्सनं २०११ च्या वर्ल्डकपनंतर पहिल्यांदाच केली अशी कामगिरी, मिळवली वाहवा!

IND vs ENG: टीम इंडियाच्या ओपनर्सनं २०११ च्या वर्ल्डकपनंतर पहिल्यांदाच केली अशी कामगिरी, मिळवली वाहवा!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England, 3rd ODI, Pune: भारत आणि इंग्लंड दरम्यान पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट संघाच्या स्टेडियमवर तिसरा एकदिवसीय सामना सुरू आहे. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि भारतीय संघाला पुन्हा एकदा फलंदाजीला पाचारण केलं. भारतीय संघाच्या सलामी जोडीनं आज पुन्हा एकदा दमदार सुरुवात करुन दिली. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) यांनी पहिल्या विकेटसाठी १०३ धावांची भागीदारी रचली. रोहित-धवन जोडीनं या कामगिरीसह काही रेकॉर्ड देखील आपल्या नावावर केले आहेत. 

टीम इंडियानं फिरकीपटूंना बाहेर बसवलं खरं, पण इंग्लंडच्या फिरकीपटूंनीच घेतल्यात पहिल्या तीन विकेट्स!

भारताने आजच्या सामन्यात पहिल्या १० षटकांमध्ये बिनबाद ६५ धावा केल्या. भारतात एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करत पहिल्या १० षटकांमध्ये एकही विकेट न गमावता याआधी भारतीय संघानं पाकिस्तान विरुद्धच्या २०११ सालच्या वर्ल्डकपमध्ये खेळविण्यात आलेल्या उपांत्य फेरीत ७३ धावा केल्या होत्या. वर्ल्डकपनंतर आज भारतानं पुन्हा एकदा प्रथम फलंदाजी करत पहिल्या १० षटकांमध्ये एकही विकेट न गमावता ६५ धावा केल्या. अर्थात पाकिस्तान विरुद्धच्या धावसंख्येला मागे टाकलं नसलं तर आज सलामीवीरांनी विकेट न गमावता केलेली सुरुवात संघाचा आत्मविश्वास वाढवणारी ठरली आहे. 

टीम इंडियात गेल्या ८१ ODI सामन्यांत पहिल्यांदाच असं घडलं; सर्वच आश्चर्यचकीत!

रोहित-धवन जोडी ५ हजारी मनसबदार
रोहित आणि धवन जोडीला भारतीय एकदिवसीय क्रिकेटमधील महत्वाच्या सलामीजोडींमध्ये समाविष्ट केलं जातं. दोघंही भारतासाठी चांगली सुरुवात करून देत आले आहेत. आज दोघांनी एकत्रितरित्या खेळताना ५ हजार धावांचा टप्पा पूर्ण केले. रोहित-धवन जोडीनं आज शतकी भागीदारी रचली असून सर्वाधिक शतकी भागीदारी करणाऱ्या सलामीजोडींच्या यादीत दोघं दुसऱ्या स्थानावर आहेत. रोहित आणि धवन यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये १७ वेळा शतकी भागीदारी रचली आहे. तर याआधी भारतीय संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर या सलामीजोडीनं २१ वेळा शतकी भागीदारीनं सुरुवात केली होती. पण रोहित आणि धवन यांनी शतकी भागीदारी रचण्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या अॅडम गिलख्रिस्ट आणि मॅथ्यू हेडन जोडीला मागे टाकलं आहे. गिलख्रिस्ट-हेडन जोडीनं ऑस्ट्रेलियासाठी सलामीला फलंदाजी करताना १६ वेळा शतकी भागीदारी रचली आहे. 
 

Web Title: india vs england rohit sharma and shikhar creates record during third odi against england

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.