IND vs ENG: टीम इंडियात गेल्या ८१ ODI सामन्यांत पहिल्यांदाच असं घडलं; सर्वच आश्चर्यचकीत!

India vs England, 3rd ODI, Pune: भारतीय संघानं तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात आपल्या 'प्लेइंग इलेव्हन'मध्ये मोठा बदल केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 01:55 PM2021-03-28T13:55:47+5:302021-03-28T13:56:54+5:30

whatsapp join usJoin us
india vs england 3rd odi pune no yuzvendra Chahal no kuldeep yadav in the team | IND vs ENG: टीम इंडियात गेल्या ८१ ODI सामन्यांत पहिल्यांदाच असं घडलं; सर्वच आश्चर्यचकीत!

IND vs ENG: टीम इंडियात गेल्या ८१ ODI सामन्यांत पहिल्यांदाच असं घडलं; सर्वच आश्चर्यचकीत!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England, 3rd ODI, Pune: भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा एकदिवसीय सामना पुण्यात खेळवला जात आहे. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत १-१ अशी बरोबरी असल्यानं आजचा सामना मालिका विजयासाठी निर्णायक सामना आहे. भारतीय संघानं तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात आपल्या 'प्लेइंग इलेव्हन'मध्ये मोठा बदल केला. फिरकीपटू कुलदीप यादव याला डच्चू देत भारतीय संघात वेगवान गोलंदाज टी.नटराजन याचा समावेश करण्यात आला आहे. महत्वाची बाब अशी की, भारतीय संघात आजच्या सामन्यात एकही पूर्णवेळ फिरकीपटूचा समावेश करण्यात आलेला नाही. 

निर्णायक लढतीसाठी टीम इंडियात मोठा बदल, टी-२० स्पेशालिस्ट गोलंदाजाला संधी; जाणून घ्या Playing XI

ना कुलदीप, ना चहल; असं पहिल्यांदाच घडलं
इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कुलदीप यादवची कामगिरी निराशाजनक राहिली होती. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात कुलदीपच्या जागी यजुवेंद्र चहल याचा समावेश केला जाईल अशी दाट शक्यता होती. पण भारतीय संघानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत एका फिरकीपटूला बाहेर बसवून वेगवान गोलंदाजाचा समावेश संघात केला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात भारतीय संघात कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल दोघंही खेळत नाहीयत. संघात एकाही पूर्णवेळ फिरकीपटूला न खेळविण्याचा प्रकार गेल्या ८१ एकदिवसीय सामन्यांनंतर पुन्हा एकदा घडला आहे. 

भारतीय संघ याआधी १८ जून २०१७ साली चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एकाही पूर्णवेळ फिरकीपटू शिवाय खेळला होता. त्याही सामन्यात कुलदीप आणि चहल संघाबाहेर होते. 
 

Web Title: india vs england 3rd odi pune no yuzvendra Chahal no kuldeep yadav in the team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.