Join us  

India vs England ODI : इंग्लंड संघात 'या' खेळाडूचं नाव पाहून विराटसेनेची चिंता वाढली!

भारताविरूद्घच्या तीन वन डे सामन्यांसाठी यजमान इंग्लंडने आपला 14 खेऴाडूंचा संघ जाहीर केला. या संघात बरेच बदल नसले तरी असे एक नाव आहे की त्याने विराट सेनेची चिंता वाढली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2018 7:41 PM

Open in App
ठळक मुद्देघरच्या प्रेक्षकांसमोर सप्टेंबर 2017 मध्ये बेन अखेरचा वन डे सामना खेऴला होता

लंडन - विराट कोहलीच्या सेनेला रोखण्यासाठी इंग्लंडने खेऴलेल्या चालीने भारतीय संघाची चिंता वाढली आहे. भारताविरूद्घच्या तीन वन डे सामन्यांसाठी यजमान इंग्लंडने आपला 14 खेऴाडूंचा संघ जाहीर केला. या संघात बरेच बदल नसले तरी असे एक नाव आहे की त्याने विराट सेनेची चिंता वाढली आहे.या वन डे मालिकेला 12 जूलैपासून सुरूवात होत आहे. यासाठी इंग्लंडने बेन स्टोक्सला संघात स्थान देऊन भारतासमोर आव्हान उभे केले आहे. दुखापतीमुऴे स्टोक्सला मे महिन्यात झालेल्या पाकिस्तानविरूद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली होती. तसेच त्याला स्कॉटलंड आणि ऑस्ट्रेलिया या संघांविरूद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेलाही मुकावे लागले होते.  5 जूलैला कौंटी क्रिकेट सामन्यातून बेनची फिटनेस टेस्ट होणार आहे. त्यात तो पास झाल्यास ट्वेंटी-20 मालिकेसाठीच्या संघातही त्याला संधी मिऴू शकते. घरच्या प्रेक्षकांसमोर सप्टेंबर 2017 मध्ये बेन अखेरचा वन डे सामना खेऴला होता. इंग्लंडचा संघ - इयॉन मॉर्गन ( कर्णधार), मोईन अली, जॉनी बेअरस्टो, जॅक बॉल, जोस बटलर ( यष्टीरक्षक), टॉम कुरान, अॅलेक्स हेल्स, लायम प्लंकेट, आदिल रशीद, जो रूट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, डेव्हिड विली, मार्क वूड. 

वन डे मालिकेचे वेऴापत्रकपहिला सामना - 12 जुलै, ट्रेंट ब्रिज, सायं. 5 वा.दुसरा सामना - 14 जुलै, लॉर्ड्स, सायं. 5 वा.तिसरा सामना - 17 जुलै, इमिरेड हेडिंग्ले,  सायं. 5 वा. 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडभारतविराट कोहलीबेन स्टोक्सक्रिकेटक्रीडाटी-20 क्रिकेट