Join us  

IND vs ENG: टीम इंडियानं फिरकीपटूंना बाहेर बसवलं खरं, पण इंग्लंडच्या फिरकीपटूंनीच घेतल्यात पहिल्या तीन विकेट्स!

IND vs ENG, 3rd ODI, Pune: इंग्लंडच्या आदिल रशीनं सलामीवीर रोहित शर्मा (३७), शिखर धवन (६७) यांना माघारी धाडलं. त्यानंतर मोईन अली यानं कर्णधार विराट कोहली (७) याला त्रिफळाचीत करुन माघारी धाडलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 3:21 PM

Open in App

India vs England, 3rd ODI, Pune: भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाची सुरुवात चांगली राहिली. सलामीवर शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी शतकी भागीदारी रचून दमदार सुरुवात केली खरी पण इंग्लंडच्या फिरकीपटूंनी आता टीम इंडियाच्या तीन महत्वाच्या फलंदाजांना माघारी धाडलं आहे. 

इंग्लंडच्या आदिल रशीनं सलामीवीर रोहित शर्मा (३७), शिखर धवन (६७) यांना माघारी धाडलं. त्यानंतर मोईन अली यानं कर्णधार विराट कोहली (७) याला त्रिफळाचीत करुन माघारी धाडलं आहे. विशेष म्हणजे, इंग्लंडकडून पहिली ११ षटकं वेगवान गोलंदाजांनी टाकली. यात शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी तुफान फटकेबाजी करत १०३ धावांची भागीदारी रचली. पण त्यानंतर फिरकीपटूंचा मारा सुरू होताच भारतीय संघाला तीन झटके बसले आहेत. 

आदिल रशीद आणि मोईन अली यांनी भारतीय फलंदाजांना जखडून ठेवत भारतीय संघाच्या धावसंख्येला लगाम घालण्याचं काम केलं आहे. इंग्लंडच्या फिरकीपटूंची कामगिरी भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. कारण भारतीय संघानं आज संघात एकाही पूर्णवेळ फिरकीपटूला स्थान दिलेलं नाही. 

IND vs ENG: टीम इंडियात गेल्या ८१ ODI सामन्यांत पहिल्यांदाच असं घडलं; सर्वच आश्चर्यचकीत!

भारतीय संघात आजच्या सामन्यासाठी मोठा बदल करण्यात आला आहे. दुसऱ्या सामन्यात निराशाजनक कामगिरी केलेल्या फिरकीपटू कुलदीप यादव याला बाहेर बसवून संघात वेगवान गोलंदाज टी. नटराजन याला संधी दिली आहे. खरंतर कुलदीपच्या जागी यजुवेंद्र चहल याला संधी दिली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. पण तसं न केल्यानं सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का बसला आहे. 

भारतीय संघात कृणाल पंड्याचा समावेश करण्यात आला आहे. पण कृणाल फुल टाइम फिरकीपटू म्हणून ओळखला जात आहे. त्यात आता इंग्लंडच्या फिरकीपटूंची गोलंदाजी पाहता भारतीय संघाला अडचणी वाढवणारं ठरू शकतं. 

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध इंग्लंडभारतीय क्रिकेट संघयुजवेंद्र चहलकुलदीप यादव