Join us  

IND vs ENG: षटकारांची उधळण! भारत वि. इंग्लंड वनडे मालिकेत आजवरचे सर्वाधिक षटकार

india vs england most sixes in a 3 match ODI series: भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिकेनं नोंदवला अनोखा विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 4:34 PM

Open in App

India vs England, 3rd ODI, Pune: भारत विरुद्ध इंग्लंड वनडे मालिकेतील तिसरा सामना पुण्यात महाराष्ट्र क्रिकेट संघाच्या स्टेडियमवर सुरू आहे. १-१ अशी बरोबरीत असलेली मालिका आत निर्णायक टप्प्यात आहे. आजचा सामना भारतीय संघ कसोटी, टी-२० नंतर वनडे मालिका देखील जिंकणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. पण या मालिकेनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक अनोखा विक्रम नोंदवला आहे. (india vs england most sixes in a 3 match ODI series)

टीम इंडियाच्या ओपनर्सनं २०११ च्या वर्ल्डकपनंतर पहिल्यांदाच केली अशी कामगिरी, मिळवली वाहवा!भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिका आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीन सामन्यांचा समावेश असलेल्या एकदिवसीय मालिकेत सर्वाधिक षटकार ठोकले गेलेली मालिका ठरली आहे. सध्या तिसरा सामना सुरू असून भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत आहे आणि आतापर्यंत या मालिकेत एकूण ५८ षटकार ठोकले गेलेले आहेत. याआधी २०१९ साली न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका एकदिवसीय मालिकेत एकूण ५७ षटकार ठोकले गेले होते. या रेकॉर्डला मागे टाकत आता भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेनं नवा रेकॉर्ड केला आहे. 

टीम इंडियानं फिरकीपटूंना बाहेर बसवलं खरं, पण इंग्लंडच्या फिरकीपटूंनीच घेतल्यात पहिल्या तीन विकेट्स!

महत्वाची बाब म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर देखील भारतीय संघा विरुद्धच्याच मालिकांचा सर्वाधिक षटकारांच्या यादीत समावेश आहे. याआधी २०१७ साली भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिकेत एकूण ५६ षटकार ठोकले गेले होते. तर २०१९ साली भारत विरुद्ध वेस्ट इंडिज एकदिवसीय मालिकेत ५५ षटकार पाहायला मिळाले होते. 

टीम इंडियात गेल्या ८१ ODI सामन्यांत पहिल्यांदाच असं घडलं; सर्वच आश्चर्यचकीत!

भारत विरुद्ध इंग्लंड सध्याच्या एकदिवसीय मालिकेत आतापर्यंत ५८ षटकार ठोकले गेले असून आजच्या सामन्यात इंग्लंडचा डाव अद्याप बाकी आहे. तर भारतीय संघाच्या डावातील १५ षटकांचा खेळ शिल्लक आहे. 

सर्वाधिक षटकार ठोकले गेलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकाभारत विरुद्ध इंग्लंड, २०२१- ५८* षटकारन्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका, २०१९- ५७ षटकारभारत विरुद्ध इंग्लंड, २०१७- ५६ षटकारभारत विरुद्ध वेस्ट इंडिज, २०१९- ५५ षटकार

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडभारतीय क्रिकेट संघरिषभ पंतहार्दिक पांड्याक्रुणाल पांड्या