Join us

India vs England : जिते हैं शानसे... सुनील गावस्कर यांची संघावर स्तुतीसुमने

हिंदी चित्रपटातील ' जिते हैं शानसे ' हे गाणचं मला आता म्हणावसं वाटतं, असा स्तुतीसुमनांचा वर्षाव भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2018 22:16 IST

Open in App
ठळक मुद्देआपण एकेरी धाव काढून जिंकलो नाही... नो बॉलवर जिंकलो नाही, वाईड बॉलवर जिंकलो नाही, तर भारतीय संघ षटकार ठोकून जिंकला आहे - गावस्कर

ब्रिस्टल : आपण एकेरी धाव काढून जिंकलो नाही... नो बॉलवर जिंकलो नाही, वाईड बॉलवर जिंकलो नाही, तर भारतीय संघ षटकार ठोकून जिंकला आहे. हिंदी चित्रपटातील ' जिते हैं शानसे ' हे गाणचं मला आता म्हणावसं वाटतं, असा स्तुतीसुमनांचा वर्षाव भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी केला आहे.

रोहितचे तोंडभरून कौतुकगावस्कर यांनी यावेळी  रोहितचे तोंडभरून कौतुक केले. " रोहितची ही खेळी नजरेची पारणे फेडणारी होती. रोहित जेव्हा फटकेबाजी करायला सुरुवात करतो, तेव्हा ते पाहणे सुखावणारे असते. रोहित जर असा खेळायला लागला तर कितीही धावांचे आव्हान असेल तर ते भारतीय संघासाठी थिटेच असेल. "

टॅग्स :इंग्लंड विरुद्ध भारतसुनील गावसकररोहित शर्मा